नाशिक : नाशिक महानगरपालिकेचे माजी महापौर दशरथ पाटील आणि अशोक मुर्तडक यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील शुभ दीप निवासस्थानी शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत लक्षणीय वाढ झाली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दशरथ पाटील महापौर असताना पार पडलेल्या नाशिक कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाचा उल्लेख करत, “कुंभमेळ्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य आयोजनाचे नियोजन, प्रशासनाशी समन्वय आणि जनतेच्या सोयीसुविधांचा अनुभव शिवसेनेसाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.






