Thursday, January 8, 2026

आजचे Top Stock Picks- मजबूत रिटर्न्ससाठी 'हे' ४ शेअर गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणार?

आजचे Top Stock Picks- मजबूत रिटर्न्ससाठी 'हे' ४ शेअर गुंतवणूकदारांना फायदेशीर ठरणार?

प्रतिनिधी: आज मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस व जेएम फायनांशियल इन्स्टिट्युशनल सिक्युरिटीज लिमिटेड (JMFL) ब्रोकरेज कंपन्यांनी नवे शेअर चांगल्या परताव्यासाठी सूचवले आहेत. जाणून घेऊयात कुठले शेअर खरेदीसाठी फायदेशीर गुंतवणुकदारांना ठरतील?

मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस -

१) Adani Ports and SEZ - कंपनीला मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेस या ब्रोकरेज कंपनीने या शेअरला बाय कॉल दिला असून सीएमपी (सामान्य खरेदी किंमत CMP) १४७३ रूपये निश्चित केली असून ब्रोकरेजने २२% अपसाईड वाढीसह १८०० रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price) निश्चित केली आहे.

जेएमएफल (जेएम फायनांशियल सर्विसेस)-

२) Bharat Heavy Electricals- जेएमएफएल या ब्रोकरेज कंपनीने शेअरला बाय कॉल दिला असून कंपनीने लक्ष्य किंमत ३६३ रुपये प्रति शेअर निश्चित केली आहे ‌.

३) Dixon Technologies- डिक्सन टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून १३८०० रुपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

४) Indian Energy Exchange IEE- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १६० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >