प्रतिनिधी: गेल्या काही दिवसांपासून आलेल्या आकडेवारीनुसार भारताच्या करदात्यात वाढ झाल्याचे आपण पाहिले होते. त्याआधारे आकडेवारीनुसार आता भारतातील चांगल्या पातळीवर असलेल्या पगारदार वर्गाची संख्या वेगाने वाढत आहे. वेगाने वाढत आहे. आकडेवारीनुसार वार्षिक ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावणाऱ्या अत्योच्च पगारदार करदात्यांचा वाटा आर्थिक वर्ष २०२४ मधील १८.४% २०२५ मध्ये २३.३४% पर्यंत वाढला आहे असे असे एका नवीन अहवालात बुधवारी म्हटले गेले आहे. क्लियरटॅक्सने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, हे मध्यम आणि उच्च-मध्यम वर्गामध्ये झालेली आर्थिक प्रगती सूचित करत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.हे निष्कर्ष क्लियरटॅक्सच्या 'हाऊ इंडिया फाइल्ड इन २०२५' या वार्षिक अहवालाचा भाग आहेत ज्यामध्ये भारतीय लोक कसे कमावतात, गुंतवणूक करतात आणि संपत्ती निर्माण करतात हे समजून घेण्यासाठी लाखो आयकर विवरणपत्रांचे विश्लेषण करण्यात आले.
उत्पन्नाची वाढलेली वर्षे स्पष्टपणे निष्कर्षात दिसून येतात. उपलब्ध माहितीनुसार,४०-५० वयोगटातील जवळपास ३८% पगारदार करदाते वार्षिक ३० लाख रुपयांपेक्षा जास्त कमावतात, ज्यामुळे हा गट देशातील सर्वाधिक कमाई करणारा आणि कर-योगदान देणारा घटक बनला आहे. करिअरच्या मधल्या वर्षांमध्ये अनुभव आणि करिअरमधील स्थिरता अधिक पगारात कशी रूपांतरित होते याचे विस्तृत विवेचन या अहवालात करण्यात आले आहे. त्याच वेळी भारतीय लोक आपले उत्पन्न कसे मिळवतात यात एक मोठा बदल झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. करदाते आता केवळ पगारावर अवलंबून नाहीत. ITR-3 आणि ITR-2 दाखल करण्याच्या संख्येत झालेली मोठी वाढ दर्शवते की अधिक लोक व्यवसाय, व्यापार आणि गुंतवणुकीतून कमाई करत आहेत. त्यामुळे व्यवसायाकडे असलेला कलही या अहवालातून स्पष्ट करण्यात आला आहे.एकाच उत्पन्नाच्या करिअरपासून विविध उत्पन्न स्रोतांकडे होत असलेल्या बदलाचे संकेत आहे.
२५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये आरटीआर दाखल करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि अनेक प्रथमच विवरणपत्र दाखल करणाऱ्यांनी आधीच भांडवली नफा नोंदवला आहे असा दावा अहवालाने केला. वय वर्ष २५ ते ३५ वयोगटातील मिलेनियल्स या बदलात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. आण्टी एका निष्कर्षानुसार सक्रिय गुंतवणूक, व्यापार आणि अनेक उत्पन्न स्रोतांमुळे क्लिष्ट आयटीआर दाखल करणाऱ्यांमध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे हा भाग अर्थव्यवस्थेतील दृष्टीने महत्वाचा आहे. हा अहवाल असेही नमूद करतो की क्रिप्टो मालमत्ता ही मुख्य प्रवाहातील गुंतवणूक न राहता एक वाढलेल्या जोखमीची अतिरिक्त बाबही बाजारात अस्तित्वात आहे.
गुंतवणूक करणे ही आता एक विशेष कृती न राहता एक सामान्य आर्थिक सवय बनली आहे. ITR-3 दाखल करणाऱ्या बहुसंख्य करदात्यांनी भांडवली नफा नोंदवला आहे असे अहवालात म्हटले गेले आहे. त्यातूनच इक्विटी बाजार आणि व्यापार आता अनेक भारतीयांच्या नियमित आर्थिक नियोजनाचा भाग बनले आहेत. तरुण भारतीय गुंतवणूकदारांच्या मानसिकतेने कार्यक्षेत्रात मोठ्या संख्येने भाग घेत असल्याचेही अहवालात म्हटले गेले आहे.






