अशी असणार शिक्षकांवर जबाबदारी
अलिबाग : आधीच अनेक अशैक्षणिक कामाचे ओझे असताना आता प्राथमिक शिक्षकांवर श्वान नियंत्रण कार्यक्रमाचा भाग म्हणून गावातील श्वान मोजण्याची जबाबदारी प्राथमिक शिक्षकांवर येऊन पडली आहे.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी येत्या शुक्रवारी ९ जानेवारी रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, विभागांचे अधिकारी आणि प्रशासन यांच्यात चर्चा होणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच या निर्णयाविरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्याचा निर्णय काही शिक्षक संघटनांनी घेतला आहे. श्वानदंशाचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करीत असतानाच ही जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था, पशुसंवर्धन विभाग किंवा स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावी अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेला विरोध दर्शविण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात दरवर्षी साधारणतः दोन हजारांहून अधिक नागरिकांना श्वानदंश होण्याच्या घटना घडत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, मूळ अध्यापन कामांवर परिणाम श्वानगणनेमुळे शिक्षकांच्या होणार असल्याचा आक्षेप शिक्षक मूळ अध्यापन कार्यावर परिणाम संघटनांनी घेतला आहे.
आम्ही शिक्षक आहोत, श्वानगणक नव्हे, अशी भूमिका अनेक संघटनांनी निवडणुका, जनगणना, विविध मांडली आहे. शिक्षणाशिवाय सर्वेक्षणे आणि आता श्वानगणना अशा अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे शिक्षकांवर ताण वाढत असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात साधारणतः प्रत्येक घरात एकतरी श्वान पाळलेला असतो. पाळीव आणि भटके श्वान यामधील फरक ओळखणे, प्रत्येक घरातील श्वानांची नोंद घेणे, तसेच गावात, वाड्या-वस्त्यांमध्ये व गल्ल्यांमध्ये मुक्तपणे भटकणाऱ्या कुत्र्यांवर नजर ठेवणे, ही जबाबदारी शिक्षकांवर येऊन पडली आहे. या कामात मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी, तर सर्व्हेक्षणासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचे सरकारी आदेश आल्याने शिक्षकांमध्ये नाराजी आहे. श्वानगणनेची जबाबदारी थेट शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.