मोहित सोमण: चांदीतील चढउतार शिगेला पोहोचला आहे. भारतीय बाजारात सकाळच्या सत्रापासून विक्रमी वाढ झाली असताना पुन्हा एकदा एमसीएक्स कमोडिटी बाजारात सोने ५००० रूपयांनी कोसळल्याचे रिपोर्टिंग माध्यमांनी केले आहे. दरम्यान 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात दुपारपर्यंत आज १० रुपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात थेट १०००० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २६३ रुपये, व प्रति किलो दर २६३००० रुपयांवर पोहोचले आहेत. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति १० ग्रॅम सरासरी दर मुख्य शहरात २६३० रूपये, व प्रति किलो दर २६३००० रुपयांवर पोहोचला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) चांदीचे दर मात्र दुपारी २.०२ वाजेपर्यंत थेट १.३१% कोसळल्याने एमसीएक्स अथवा (कॉमेक्स Comex) दर २५५४२६ रूपयांवर पोहोचले आहेत. तरीही चांदी ५००० रूपयांनी कमोडिटी कोसळली असून बाजारातील अस्थिरता (Volatility) आणखी वाढली आहे.
युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर युएसने व्हेनेझुएला राष्ट्रावर कब्जा मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात क्रूड व सोनेचांदीत चढउतार वाढली होती. आजही याचा कित्ता गिरवला असताना अचानक अस्थिरता व रूपयातील वाढीमुळे चांदी थेट ५००० रुपयांनी इंट्राडे कोसळली. सकाळी चांदी ८२.५४८ प्रति डॉलर औस या नव्या उच्चांकावर पोहोचली होती. त्यामुळे ही वाढ २५९३२२ रूपये प्रति किलोवर झाल्याचे रिपोर्टिंग प्रसारमाध्यमांनी केले.चांदीतील मागणीत घट झाल्यानंतर रूपयात वाढ झाल्याने दरपातळीत आज दुपारपर्यंत घसरण झाली आहे. तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे दिवसभरात हा अस्थिरतेचा ट्रेड कायम राहू शकतो. याविषयी बोलताना तज्ञांनी म्हटले आहे की,' अमेरिका-व्हेनेझुएला यांच्यातील सध्याच्या संकटामुळे चांदीच्या किमती अस्थिर राहण्याची शक्यता आहे, कारण या संकटामुळे पेरू, चाड, मेक्सिको आणि इतर लॅटिन अमेरिकन राष्ट्रांमधून होणाऱ्या चांदीच्या निर्यातीत व्यत्यय येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुरवठ्याबाबतची चिंता वाढेल.'
जागतिक स्तरावर चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत थेट १.४८% घसरण झाली आहे. त्यामुळे ही पातळी ७९.७५ प्रति औंसवर गेली आहे. मागील सत्रात चांदीमध्ये मोठी वाढ नोंदवली गेल्यानंतर सकाळच्या सत्रात चांदीने मोठी वाढ नोंदवली होती. थेट १ ते २% पातळीवर चांदी व्यवहार करत असताना अखेर अस्थिरतेने सपोर्ट लेवल घसरल्याने चांदीत ५००० रुपयांपर्यंत घसरण झाली असली तरी देखील पुन्हा एकदा चांदीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अर्थातच भूराजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्याने चांदीचा भाव ५.१४% नी वाढून २५८८११ पातळीवर सकाळनंतर स्थिरावला. व्हेनेझुएलामधील अमेरिकेच्या लष्करी कारवाईने आणि राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अटक केल्याने जागतिक बाजारपेठेत नवीन अनिश्चितता निर्माण झाली असून युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्या हल्ल्याची धमकी दिल्याच्या वृत्तांमुळे जोखीम टाळण्याची प्रवृत्ती वाढली ज्यामध्ये चांदीचा पुरवठा अनिश्चितत झाला आहे. अपेक्षेपेक्षा कमकुवत अमेरिकन उत्पादन क्षेत्राची आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या अधिकाऱ्यांच्या नव्या नकारात्मक विधानांमुळे बाजारातील भावनांना आणखी पाठिंबा मिळाला आहे. तरीही गुंतवणूकदार आगामी फेड बैठकीत व्याजदर स्थिर राहण्याची शक्यता ८०% पेक्षा जास्त गुंतवणूकदार अपेक्षित करत आहेत.
मूलभूतपणे, चांदीला पुरवठ्याची मर्यादित संख्या आणि वाढलेला औद्योगिक वापर आणि औद्योगिक मागणी तसेच गुंतवणुकीच्या प्रवाहातून मिळणाऱ्या मजबूत मागणीमुळे सातत्याने बळ मिळत आहे. ऑक्टोबरमध्ये ६६० टनांपेक्षा जास्त विक्रमी निर्यातीनंतर चिनी साठा दशकातील नीचांकी पातळीवर पोहोचला होता. त्यामुळे आजही चांदीतील अस्थिरता आज कायम असल्याचे अधिक प्रमाणात दिसून आले.






