Thursday, January 8, 2026

सेबी रियल टाईम डेटा नियमात बदल करणार 'कन्सल्टेशन पेपर' बाजारात दाखल

सेबी रियल टाईम डेटा नियमात बदल करणार 'कन्सल्टेशन पेपर' बाजारात दाखल

मोहित सोमण: सेबी (Security Exchange Board of India SEBI) या भांडवली बाजारातील नियामक मंडळाने आणखी एक महत्वाचा कन्सल्टेशन पेपर बाजारात आणला आहे. नव्या नियमानुसार, आता आगामी काळात सेबीने गुंतवणूकदारांच्या ग्राहक संरक्षणासाठी नवा कायदा आणणार आहेत. कंपन्यांच्या टाईम लाईन डेटातील बदल यामध्ये सूचवले जाणार आहेत. नवीन नियमावली आखण्यापूर्वी सेबीने गुंतवणूकदार व नागरिकांकडून प्रतिक्रिया मागितल्या आहेत. २७ जानेवारीपर्यंत गुंतवणूकदार आपल्या प्रतिक्रिया अथवा अभिप्राय सेबीकडे नोंदवू शकतील.

नव्या नियमावलीत काय असू शकते?

नव्या नियमात, कंपनीचा लाईव डेटा केवळ एक्सचेंज शेअर करू शकतील अर्थातच तो ट्रेडिंग व संबंधित कारणासाठी असावा.

नव्या नियमानुसार, ज्ञानवर्धनसाठी अथवा शिकण्यासाठी १ दिवसाच्या अंतराने असावा. त्वरीत डेटा शेअर करण्यास संस्थांना मनाई असेल.

यापूर्वी जानेवारी २०२५ मधील सेबी पत्रकानुसार केवळ ३ महिन्यांच्या कालावधीनंतर हा डेटा शेअर करता येईल असे म्हणण्यात आले होते. तत्पूर्वी में २०२४ मध्ये सेबीच्या परिपत्रकानुसार, केवळ १ दिवसाच्या कालावधीनंतर शेअर करण्याची मुभा होती. त्यामुळे दोन्ही परिपत्रकाचा उदेश वेगळा होता असे सेबीने स्पष्ट केले. त्यामुळे मे २०२४ च्या परिपत्रकाने एक्सचेंजेसना शैक्षणिक उद्देशांसाठी एक दिवसाच्या विलंबाने अथवा नंतर डेटा सामायिक करण्याची परवानगी दिली होती असे सेबीने नव्या सूचनेत म्हटले आहे. तर जानेवारी २०२५ चे परिपत्रक त्यानंतर लागू होते आणि त्यात केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी किती जुना डेटा वापरला जाऊ शकतो हे नमूद केले आहे आणि त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे असेही पुढे सेबीने म्हटले.

त्यामुळे नव्या पेपरनुसार दोन्ही अधिसूचनेत सामायिकता आणून भागभांडवलधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी (विशेषतः गुंतवणूक व अभयासासाठी) आणल्याचे सेबीने म्हटले.

यासह मे २०२४ च्या परिपत्रकाने एक्सचेंजेसना शैक्षणिक उद्देशांसाठी एक दिवसाच्या विलंबाने डेटा सामायिक करण्याची परवानगी दिली असून तर जानेवारी २०२५ चे परिपत्रक त्यानंतर लागू होते आणि त्यात केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी किती जुना डेटा वापरला जाऊ शकतो हे नमूद केले आहे आणि त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

नव्या लिस्टेड कंपन्यांच्या रिअल टाइम किमतीच्या डेटाचा वापर करणाऱ्या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्म, ॲप्स, वेबसाइट्स इत्यादींच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी सेबीने २४ मे २०२४ रोजीच्या परिपत्रकाद्वारे 'थर्ड पार्टी रिअल टाइम किमतीचा डेटा सामायिक करण्यासंबंधीचे नियम प्रसिद्ध केले होते. या नियमांनुसार, कोणत्याही थर्ड पार्टीसह विविध प्लॅटफॉर्मसह, रिअल टाइम किमतीचा डेटा सामायिक केला जाणार नाही. केवळ जिथे सिक्युरिटीज बाजाराच्या सुव्यवस्थित कामकाजासाठी किंवा नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी अशी माहिती सामायिक करणे आवश्यक आहे या अशाच प्रकरणांचा अपवाद असेल असे सेबीने म्हटले आहे.

गुंतवणूकदार शिक्षण आणि सल्ला/शिफारस यांमध्ये फरक करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे बाजाराचा डेटा, ज्यावर आधारित शैक्षणिक सामग्री विकसित केली जाते. शैक्षणिक उद्देशांसाठी थेट डेटा वापरणे हे शुद्ध शैक्षणिक कार्यांच्या व्याप्तीच्या बाहेर आहे कारण यामध्ये भविष्यातील किमतींचा अंदाज लावण्यासाठी सध्याच्या डेटाचे विश्लेषण करणे समाविष्ट आहे जे गुंतवणूक सल्लागार (Investment Advisors)/संशोधन विश्लेषक (Research Advisors) कार्यांच्या व्याख्येत येते असे सेबीने पुढे म्हटले.

आणखी सेबीने काय म्हटले?

शैक्षणिक उद्देशांसाठी किमतीचा डेटा प्रदान करण्यासाठी एक दिवसाचा विलंब हा MIIs (Market Infrastructure Institutions) आणि बाजार मध्यस्थांनी पाळायचा किमान तांत्रिक विलंब आहे. तर तीन महिन्यांच्या विलंबाचा निकष ही एक सामग्री आधारित अट आहे जी शिक्षकांनी पाळणे आवश्यक असेल जेणेकरून त्यांची सामग्री पूर्णपणे शैक्षणिक मानली जाईल असेही सेबीने म्हटले.

SEBI ला भागधारकांकडून एक दिवसाचा विलंब खूप कमी असल्याबद्दल आणि एक दिवसाच्या विलंबाच्या डेटाचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याबद्दल टिप्पण्या प्राप्त झाल्या ज्यामुळे विलंब कालावधी वाढवण्याची गरज निर्माण झाली. अंतर्गत स्तरावर, तीन महिन्यांचा विलंब खूप जास्त आहे आणि जर हा कालावधी कमी केला तर शैक्षणिक माहिती अधिक प्रभावी होऊ शकते, यावरही विचारविनिमय करण्यात आला. त्यामुळे यातून मध्यम मार्ग काढण्याचा सेबी प्रयत्न करत असल्याचे दिसते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >