मोहित सोमण: आजही पाचव्या सत्रात घसरण कायम आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात घसरण झाल्याने सेन्सेक्स १२९.५४ व निफ्टी ४१.०५ अंकाने घसरला आहे. आज युएस व्हेनेझुएला यांच्यातील द्वंद्व कायम असताना पुन्हा एका भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी आपले सेल ऑफ नफा बुकिंग सुरू ठेवल्याने बाजारात अस्थिरता कायम राहिली आहे. सेन्सेक्स व निफ्टी दोन्ही बँक निर्देशांकात पुन्हा एकदा घसरण झाल्याने बाजारातील आधारपातळी निर्देशांकात राखता आली नाही. आगामी कंपन्यांच्या तिमाही निकालावर देखील गुंतवणूकदारांचे लक्ष केंद्रित झाले आहे. दरम्यान क्षेत्रीय निर्देशांकातील आयटी, मेटल, कंज्यूमर ड्युरेबल्स शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे घसरण मर्यादित राहिली आहे. तर ऑटो, फायनांशियल सर्विसेस एक्स बँक, प्रायव्हेट बँक निर्देशांकात मोठी घसरण झाली. सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ केएसबी (३९६.२७%), जेबीएम ऑटो (५.०७%), टाटा टेक्नॉलॉजी (४.२१%), टायटन इलेक्सी (३.२२%), इन्फोऐज इंडिया (३.२१%), एमसीएक्स (२.५४%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण इंडियन हॉटेल्स (२.७३%), मेट्रोपॉलिस हेल्थ (२.७०%), सिप्ला (२.३१%), टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल (१.९५%), टीबीओ टेक (१.७८%), आरबीएल बँक (१.५६%) समभागात झाली आहे.






