Kartik Aaryan: बॅालीवुडमधील आपल्या भन्नाट अभिनयामुळे ओळखला जाणारा अभिनेता कार्तिक आर्यन आणि सोनु की टिटु की स्विटी या चित्रपटामुळे तो सर्वाधीक जास्त प्रसिध्द झाला.पण हाच अभिनेता नुकताच सोशल मिडीयावर चर्चेत आलाय.कारण असं की अभिनेता कार्तिक आर्यनचा गोवा मधील फोटो नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यानंतर त्याला एका “मिस्ट्री गर्ल” शी जोडून चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेने इंटरनेटवर जोरदार उत्सुकता निर्माण केली, परंतु आता मिस्ट्री गर्ल करिना नावाची तरुणी आपल्या इंस्टाग्राम बायोमध्ये स्पष्टपणे म्हणाली की ती कार्तिकची गर्लफ्रेंड नाही.
अनेक युझर्सनी फोटोचे विश्लेषण करून दाखवले की, दोन्ही फोटोंमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील लाउंजर्स, टॉवेल पॅटर्न आणि व्हॉलीबॉल कोर्ट सारखे बॅकग्राउंड साम्य आढळले. रेडिट थ्रेडवर स्क्रीनशॉट व्हायरल झाले आणि अनेकांनी असा दावा केला की कार्तिक आणि करिना एकत्र सुट्टीवर आहेत.कारिनाने इंस्टाग्राम बायो अपडेट करून स्पष्ट केले, “मी कार्तिकला ओळखत नाही, मी त्याची गर्लफ्रेंड नाही, मी माझ्या कुटुंबासह सुट्टीवर आहे.” या स्पष्टीकरणानंतर ऑनलाइन चर्चेला थांबवण्याचा प्रयत्न झाला.
सोशल मीडियावर कार्तिकशी नाव जोडल्यामुळे करिनाचे फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ५ जानेवारीला तिचे फॉलोअर्स १,९२६ होते, तर ७ जानेवारी २०२६ रोजी हे १३ हजारांवर पोहोचले आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर आता मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.विशेष म्हणजे, करिना १७ वर्षांची असून, कार्तिकशी तिचे वयाचे अंतर सुमारे १७-१८ वर्ष आहे. कार्तिकने अद्याप या चर्चेला कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, परंतु सोशल मीडियावर त्यांचे नाव जोडल्यामुळे करिनाची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे.या घटनेमुळे कार्तिक आर्यन आणि करिनाच्या फोटोंभोवती सोशल मीडियावर खळबळ उडाली असून, चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे.






