Thursday, January 8, 2026

आयनॉक्स क्लिन एनर्जीची ३१०० कोटीची निधी उभारणी 'या' कारणासाठी

आयनॉक्स क्लिन एनर्जीची ३१०० कोटीची निधी उभारणी 'या' कारणासाठी

प्रतिनिधी: आयनॉक्स क्लिन एनर्जी (Inox Clean Energy) कंपनीने आपल्या कंपनीतील ३१९० कोटींचा निधी उभारला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे.इक्विटी फंडिग राऊंडमार्फत हा निधी उभारण्यात आला. आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत संपूर्ण १० गिगावॉट प्रकल्प उभारणीसाठी आवश्यक निधीचा वापर करण्यासाठी ही गुंतवणूक उभारण्यात येत आहे. कंपनीने दिलेल्या माहिती या प्रकल्पाच्या उभारणीसाठी या निधीचा वापर होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. अद्याप कंपनीने याविषयी आणखी माहिती देण्यास नकार दिला आहे. आयनॉक्स इंडियाची उपकंपनी (Subsidiary) असलेल्या आयनॉक्स सोलार इंडिया यांनी एकत्रितपणे ३१०० कोटी उभे केले असून संबंधित माहिती आयनॉक्स जीएफएल समुहाने दिली आहे.

त्यामुळे या गुंतवणूकीतून कंपनीने आपल्या एकूण भागभांडवलातील ५.८% हिस्सा विकल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच आयनॉक्स क्लीन एनर्जी कंपनीचा आयपीओ (IPO) अर्ज सेबीकडे दाखल होऊ शकतो. घरगुती व परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून कंपनीत ही गुंतवणूक होऊ शकते. आयनॉक्स एनर्जी येणाऱ्या काळात आयपीओतूनही ६००० ते १००० कोटी उभे करू शकते. अद्याप याची निश्चिती झाली नसली तरी कंपनीने सध्या उभारलेला निधी हा भांडवल वृद्धीसाठी व आयपीपी व सोलार उत्पादनासाठी वापरला जाणार असल्याचे म्हटले.

उपलब्ध माहितीनुसार, या निधी उभारणीपूर्वी डिसेंबरमध्ये आयनॉक्स क्लीन एनर्जीने ऑस्ट्रेलियास्थित मॅक्वेरी कॉर्पोरेट होल्डिंग्स पीटीवाय लिमिटेड आणि इतर भागधारकांसोबत व्हायब्रंट एनर्जीच्या नवीकरणीय मालमत्ता अधिग्रहित करण्यासाठी निश्चित करारांवर स्वाक्षरी केली होती. कंपनीने व्हायब्रंट एनर्जी (मॅकक्वेरीच्या मालकीचा आयपीपी प्लॅटफॉर्म) आणि सनसोर्स एनर्जी (नेदरलँड्स-मुख्यालय असलेल्या एसएचव्ही एनर्जी या बहुराष्ट्रीय कंपनीची पूर्ण मालकीची उपकंपनी) यांचे एकत्रितपणे १.६ गिगावॉट क्षमतेचे आयपीपी पोर्टफोलिओ अधिग्रहित केले होते अशी प्राथमिक माहिती पुढे आली होती. आता कंपनीच्या निवेदनानुसार, आयनॉक्स क्लीन मल्टी-गिगावॉट आयपीपी पोर्टफोलिओ आणि भारताबाहेरील एकात्मिक सौर उत्पादन सुविधेच्या अधिग्रहणाच्या पुढील टप्प्यात पोहोचली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा