पुणे : कामाचा त्रास व आर्थिक स्थिती खराब असल्यामुळे बहुतांश जणांच्या आत्महत्या केल्याच्या घटना दिवसेंदिवस समोर येत असतात. तसंच काही पुण्यामध्येही घडलं आहे.पुण्यामधील हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्यामुळे एका तरुण ट्रेनिंग आयटी इंजिनिअरने केल्याचे सांगितले आहे.. सुजय विनोद ओसवाल (वय २४) असं मृत तरुणाचं नाव आहे
नक्की घडलं काय ?
पुण्यात तरुणाची आत्महत्या करण्याची घटना उघडकीस झाले आहे. हा तरुण पुण्यातील हिंजवडी येथील आयटी पार्क मध्ये नाईट शिफ्टवर कार्यरत होता.तो कामादरम्यान वॅाशरुमला गेला अ्न मोबाईलच्या चार्जर केबलच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.. मात्र बराच वेळ परत न आल्याने संशय निर्माण झाला त्यादरम्यान गार्ड फेरफटका मारत असताना वॅाशरुम मध्ये सुजयने आत्महत्या केल्याच पाहिलं..
आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. तपासामध्ये हे समोर आले आहे की सुजयला आर्थिक अडचणी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे...ऑनलाईन सट्टा आणि बेंटीगमुळे त्याच्यावर भरपूर प्रमाणात कर्ज असल्याचे ही समोर आले आहे याच मानसिक तणावातून त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. आत्महत्येपूर्वी त्याने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. मात्र, आर्थिक अडचणींमुळे आपण आत्महत्या करत असल्याचा मेसेज त्याने कुटुंबियांना पाठवला होता, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






