हरियाणा : भारतात अनेक हायड्रोजनवर आधारित प्रकल्पांवर भर दिला जात आहे. हायड्रोजन कार नंतर आता हायड्रोजन टेन ची ही यशस्वी चाचणी केली गेली असून हरियाणातील सोनिपत ते जिंद या मार्गावर लवकरच देहसतील पहिली हायड्रोजन ट्रेन धावणार आहे. उत्तर रेल्वेने हा महत्वकांक्षी प्रकल्प उभारला आहे. हरियाणाचे मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या ट्रेनचे लोकार्पण करणार आहेत.
View this post on Instagram
डिझेल ट्रेन इतकाच वेग
हायड्रोजन ट्रेनला इंधन पुरवण्यासाठी सुमारे १२० कोटी रुपये खर्चून प्रकल्प उभारण्यात आला आहे. ही ट्रेन धुराऐवजी वाफ आणि पाणी बाहेर सोडेल, ज्यामुळे प्रदूषण कमी होईल. पण या गाडीचा वेग आणि प्रवासी क्षमता डिझेल ट्रेनइतकीच असेल. विशेष म्हणजे, एक किलो हायड्रोजन सुमारे साडेचार लिटर डिझेल एवढे अंतर कापण्यास सक्षम आहे. या गाड्यांची देखभाल-दुरुस्तीही तुलनेने कमी खर्चिक असणार असल्याने, डिझेल ट्रेनच्या तुलनेत रेल्वे वर येणारा आर्थिक बोजा कमी होणार आहे. इलेक्ट्रिक ट्रेनच्या तुलनेत हायड्रोजन ट्रेन तब्बल १० पट अधिक अंतर कापू शकते. ३६० किलो हायड्रोजनमध्ये ही ट्रेन १८० किलोमीटरचा प्रवास करू शकेल. विशेष म्हणजे, ही ट्रेन धावताना कोणताही आवाज करणार नाही, ज्यामुळे प्रवाशांना शांततापूर्ण प्रवास अनुभवता येईल.
हरियाणा सरकारने नुकतीच या प्रकल्पाची माहिती दिली. जिंद स्थानकावर हायड्रोजन ही ट्रेन पोहोचली असून, लवकरच ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. या प्रकल्पासाठी ऊर्जापुरवठा करण्यासाठी जिंद येथे हायड्रोजन प्रकल्प ही उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची ऊर्जा साठवण क्षमता तीन हजार किलोग्रॅम इतकी आहे. . या ट्रेनचे तिकीट दर ५ ते २५ रुपयांच्या दरम्यान ठेवले जाणार आहे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकही याचा लाभ घेऊ शकतील.






