मोहित सोमण: आज डॉलरच्या तुलनेत रूपयांची १६ पैशाने वाढ झाल्याने आज भारतीय सराफा बाजारातील सोन्याच्या किंमतीत आधार मिळाला होता. पर्यायाने आज सोन्यात घसरण झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५५ रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४१ रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३८२७ रूपये,२२ कॅरेटसाठी १२६७५ रूपये, १८ कॅरेटसाठी १०३७१ रूपयांवर पोहोचले आहेत. प्रति तोळा किंमतीबाबत संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ५५० रुपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ५०० रुपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति दरात ४१० रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३८२७० रूपये, २२ कॅरेटसाठी १२६७५० रूपये, १८ कॅरेटसाठी १०३७१० रूपयांवर पोहोचले आहेत.
मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटमागे १३८२७ रूपये, २२ कॅरेटमागे १२६७५ रुपये, १८ कॅरेटमागे १०३७१ रूपयांवर पोहोचले आहेत. तसेच भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) सोन्याच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.६५% घसरण झाली आहे त्यामुळे दरपातळी १३८१८० रूपयांवर पोहोचली आहे. संध्याकाळपर्यंत जागतिक पातळीवरील गोल्ड फ्युचर निर्देशांकात ०.६२% घसलण झाल्याने दरपातळी ४४६७.१४ प्रति डॉलर औंसवर पोहोचली आहे.
सोने का घसरले?
आज दिवसभरात साधारणतः प्रति तोळा १००० रुपयांनी घसरण झाली असून इंट्राडेत १% पेक्षा अधिक घसरण सोन्यात झाली.युएस व्हेनेझुएला बाजारात अनिश्चितता असताना मोठ्या प्रमाणात दरात चढउतार होत आहेत.आगामी युएस बाजारातील इकॉनॉमिकल आकडेवारी प्रतिक्षित असताना युएस बाजारासह जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यात स्थिर प्रतिसद दिला आहे. अद्याप युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीवरुन नकारात्मकता वाढत असताना गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्याने बाजारातील सोन्याची मागणी आज घसरली. दुसरीकडे आज मोठ्या प्रमाणात सोन्यातील नफा बुकिंग वाढल्याने बाजारात एकूणच सोन्याची दरपातळी घसरली होती. विशेषतः भारतात रूपयात वाढ झाल्याने ती अधिक प्रभावीपणे दिसली.
पुढे टेक्निकली काय स्ट्रेटेजी गुंतवणूकदारांसाठी महत्वाची?
एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी-रुपया सुमारे ०.३०% ने मजबूत होऊन ८९.८४ रूपयांवर पोहोचल्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीतील वाढ मर्यादित राहिली आणि तुलनेने स्थिर आंतरराष्ट्रीय किमती असूनही, एमसीएक्सवरील सोन्याची किंमत जवळपास ९०० रुपयांनी घसरून १३८२५० रुपयांवर आली, त्यामुळे सोन्याचा व्यापार कमजोर राहिला. व्यापक जागतिक संकेत संमिश्र असले तरी, रुपयाच्या मजबुतीमुळे स्थानिक सराफा बाजारातील भावनांवर नकारात्मक परिणाम झाला. येणारा आठवडा अमेरिकेसाठी डेटाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, ज्यात एडीपी नॉन-फार्म रोजगार, नॉन-फार्म पेरोल्स आणि प्रारंभिक बेरोजगारी दाव्यांचा समावेश आहे, ज्यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये अस्थिरता येऊ शकते आणि त्यांना दिशा मिळू शकते. सध्या, नजीकच्या काळात सोन्याचा व्यापार १३६५०० ते १४१००० या अस्थिर श्रेणीत होण्याची शक्यता आहे.'






