Wednesday, January 7, 2026

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दिल्लीत अनधिकृत मशिदीवर मनपाची कारवाई, दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार दिल्लीत अनधिकृत मशिदीवर मनपाची कारवाई, दगडफेक करणाऱ्यांना पोलिसांचा दणका

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार एमसीडी अर्थात दिल्ली मनपाने तुर्कमान गेट परिसरातील अनधिकृत मशिद आणि इतर बेकायदा बांधकाम पाडले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात मनपाने कारवाई केली. कारवाई सुरू असताना मुसलमानांनी दगडफेक करुन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी बळाचा वापर करुन परिस्थितीवर लगेच नियंत्रण मिळवले.

अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दिल्ली मनपाने दहा बुलडोझर, १५ जेसीबी, ७० डंपर यांचा वापर केला. मनपाच्या कारवाईवेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच एक हजार पोलीस जवानांचा बंदोबस्त घटनास्थळी होता. मशिदीकडे जाणारे सर्व रस्ते बॅरिकेटिंग लावून बंद करण्यात आले होते.

दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमार

कारवाई सुरू असतानाच स्थानिक लोक आणि बाहेरून आलेल्या नागरिकांनी विरोध करत जमावाने बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर दगडफेक केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या आणि गॅस बुलेट्सचा वापर केला. पोलिसांनी ड्रोन कॅमेऱ्यांच्या साहाय्याने संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली आहे. ज्यांनी दगडफेक आणि हिंसाचार केला, त्यांची ओळख सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे केली जाईल. कोणत्याही उपद्रवी व्यक्तीला सोडले जाणार नाही."

न्यायालयाचा आदेश काय होता ?

डिसेंबर महिन्यात एमसीडीने रामलीला मैदानातील अवैध अतिक्रमण आणि अनधिकृत व्यावसायिक उद्योग थांबवण्याचे आदेश दिले होते. तपासात असे आढळले की, सरकारी जमिनीचा वापर नकाशात नसलेल्या मोठ्या बांधकामासाठी आणि लग्नाचा हॉल याचा वापर खासगी कार्यक्रमांसाठी केला जात होता. दिल्ली उच्च न्यायालयाने मशिदीला लागून असलेला दवाखाना बेकायदा घोषित केला होता.

Comments
Add Comment