Thursday, January 8, 2026

Crime News: तांत्रिक शक्तीच्या हव्यासापोटी एकुलत्या एक मुलाचा बळी; बहिणीनेच घेतला पाच वर्षांच्या भावाचा जीव

Crime News: तांत्रिक शक्तीच्या हव्यासापोटी एकुलत्या एक मुलाचा बळी; बहिणीनेच घेतला पाच वर्षांच्या भावाचा जीव

चंदिगड: हल्ली माणसं पैशांच्या, संपत्तीच्या हव्यासापोटी आपल्याच जवळच्या माणसांची हत्या करत आहेत.. तसंच चंदीगडमध्ये घडलंय. तांत्रिक शक्ती मिळवण्याच्या प्रयत्नात पाच वर्षांच्या चिमुकल्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अंधश्रद्धेतून चिमुरड्याचा बळी गेला आहे. या प्रकरणात मृत बालकाच्या चुलत बहिणीनेच आणि तिच्या पतीने हे अमानुष कृत्य केल्याचे समोर आले. घटनेच्या तब्बल पाच महिन्यांनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

यमुनानगर जिल्ह्यातील कामी माजरा गावातील प्रिन्स (वय ५) हा ३० जुलै २०२५ रोजी बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ जुलै रोजी पानसरा गावातील एका शेताजवळील ट्यूबवेलजवळ नाल्यात त्याचा मृतदेह आढळून आला. प्रिन्सच्या डोक्यावर जखमांच्या खुणा असल्याने हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्यानंतर प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांचा संशय नातेवाईकांवर गेला. प्रिन्सची चुलत बहीण भारती आणि तिचा पती शिवकुमार हे दोघेही फरार झाल्याचे निदर्शनास आले. अखेर सीआयए वन पथकाने सोमवारी हमीदा हेड येथून दोघांना अटक केली. चौकशीत दोघांनीही तांत्रिक सिद्धी मिळवण्यासाठी प्रिन्सचा बळी दिल्याची कबुली दिली आहे.

प्रिन्सचा वाढदिवस साधून त्याच दिवशी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला स्मशानात नेऊन त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात दोन्ही आरोपींना तीन दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले आहे.

Comments
Add Comment