मुंबई : सध्या महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. प्रत्येक उमेदवार आपल्या पक्षाचा, आपल्या चिन्हाचा प्रचार हा जोरात करताना दिसत आहे. यंदा २९ महापालिकांमध्ये निवडणुकांसाठी एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. तर एकाच दिवशी सर्वच महापालिकांचे निकाल देखील जाहीर होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक उमेदवार हा कंबर कसून प्रचाराला लागला आहे. कुठे मोठमोठ्या रॅली, तर कुठे प्रचार सभांचे आयोजन आणि तेवढ्याच उत्साहाने उमेदवारांचे कार्यकर्ते सुद्धा प्रचाराच्या कामाला लागले आहेत.
मात्र काही वेळेस अतिउत्साह होतो आणि होत्याच नव्हतं होऊन बसत. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. एका उमेदवाराच्या कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे मोठा अनर्थ घडला आहे. हा प्रकार एका बॉलीवूड अभिनेत्रींच्या आसपासच्या परिसरात घडल्याने या प्रकारविरोधात आता बॉलिवूड अभिनेत्रीन संताप व्यक्त केला आहे.
अभिनेत्री डेझी शाह हीच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये तिने प्रचंड संताप व्यक्त केला असून , घडलेला प्रकार किती भयानक होता याबद्दल सांगितले आहे.
View this post on Instagram
डेझी शाह म्हणाली, " मी पाहिलंय की माझ्या फ्लॅटच्या शेजारील इमारतीला फटाक्यांमुळे किती भीषण आग लागली. प्रचार रॅली सुरु असताना फटाके लावले. आणि त्यामुळेच ही आग लागली, हे मूर्ख लोक आहेत.... ते प्रचार करण्यासाठी प्रत्येक इमारतीत जात आहेत. निष्काळजीपणा करत आहेत. असे अभिनेत्रीने व्हिडीओमध्ये स्पष्ट केलं आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये अभिनेत्री डेझी शाहनं लिहिलंय की, "माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. पण जेव्हा तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी एखादी टीम नियुक्त करता, तेव्हा त्यांना थोडीशी अक्कल आहे, याची खात्री करा... घरोघरी प्रचार करण्यास परवानगी देण्यास नकार दिल्याबद्दल आमच्या बांधकाम समितीचे आभार... इमारतींजवळ फटाके फोडणं योग्य नाही. जेव्हा लोकांमध्ये नागरी जाणीव नसते, तेव्हाच असं घडतं. ही नैसर्गिक आपत्ती नाही. हे मूर्ख लोकांमुळे घडलंय. जबाबदारी घ्या... पुरे झालं आता..."
अभिनेत्रीने आणखी एक व्हिडीओ शेअर करत कॅप्शन मध्ये लिहलंय की "जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे... आता निवडणुकीची वेळ आहे. प्रचार सुरु आहे हे सर्वानाच समजतंय'पण प्रचारादरम्यान फटाके फ़ोडलेच पाहिजेत असा कोणताही नियम नाही.






