Thursday, January 8, 2026

बँक ऑफ महाराष्ट्राची व्यवसाय आकडेवारी जाहीर तुम्ही हा शेअर खरेदी करावा का? वाचा

बँक ऑफ महाराष्ट्राची व्यवसाय आकडेवारी जाहीर तुम्ही हा शेअर खरेदी करावा का? वाचा

मोहित सोमण: बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) बँकेने आपल्या व्यवसायाची आकडेवारी जाहीर केली आहे. मजबूत आकडेवारीनंतर आता जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडने कंपनीच्या शेअरला बाय कॉल (खरेदीचा सल्ला) दिला आहे. बँकेने आपल्या व्यवसायात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १७.२४% वाढ झाल्याचे स्पष्ट केले होते. डिसेंबर २४ मधील ५०७६५० कोटी तुलनेत डिसेंबर २५ मध्ये ५९५१७१ कोटींवर वाढ नोंदवली होती. प्रोविजनल (तात्पुरत्या) आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण ठेवीत (Total Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर १५.३०% वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यातील २७९००७ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ३२१६९५ कोटींवर वाढ झाली आहे.

कासा ठेवीतही (CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर १५.९३% वाढ झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट करण्यात आले होते. गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या १३७४९४ कोटी तुलनेत या डिसेंबर महिन्यात १५९३९७ कोटींवर वाढ झाली होती. बँकेच्या अँडव्हान्स/कर्ज पुरवठ्यातही वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये जुळून २२८६४२ तुलनेत या डिसेंबरमध्ये २७३४७६ कोटींवर वाढ नोंदवली आहे.

बँकेच्या चांगल्या आकडेवारीनंतर आता जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेड ब्रोकरेजने बँकेच्या शेअरला बाय कॉल दिला आहे. ५४ रूपये रेकोर्ड प्राईज तुलनेत ब्रोकरेजच्या मते शेअरला १९% अपसाईड वाढ मिळू शकते. म्हणजेच जिओजित इन्व्हेसमेंट कंपनीने बँकेच्या शेअरला ६८ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने आज (७ जानेवारी) रोजी जाहीर केले की, संचालक मंडळाने (Board of Diretors) २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीची संचालक मंडळाची बैठक मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या निवेदनात ही माहिती बँकेने स्पष्ट केली.

याविषयी अधिक माहिती देताना,'आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की, बँकेच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार, १३ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे' असे कंपनीने आपल्या फाइलिंगद्वारे स्टॉक एक्सचेंजला कळवले.बँक ऑफ महाराष्ट्रचे संचालक मंडळ या बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीचे बँकेचे आर्थिक निकाल विचारात घेऊन लाभांश व इतर आर्थिक निर्णयांना मंजुरी देईल असे सांगितले जाते. त्याचवेळी संचालक मंडळ २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अंतरिम लाभांश जारी करण्याच्या प्रस्तावावर विचार करून त्याला मंजुरी देईल जेव्हा ते शेअर बाजारात एक्सचेंज फायलिंगमध्येदेखील स्पष्ट करण्यात येणार आहे.

गेल्या पाच दिवसांत बँकेच्या शेअर्समध्ये २.४८% वाढ झाली असून एक महिन्यात १२.६३% वाढ झाली आहे. एक वर्षात बँकेच्या शेअर्समध्ये २३.५५% वाढ झाली आहे तर बँकेच्या शेअर्समध्ये इयर टू डेट बेसिसवर (YTD) २.४८% वाढ झाली आहे. सध्या बँकेचे बाजार भांडवल (Market Capitalisation) हे ४८७८७.५३ कोटी रूपये आहे. जानेवारी २०२६ पर्यंत बँकेचा इंट्राडे उच्चांक ६५.९७ रुपये असून निचांक एप्रिल २०२५ मध्ये ४२ रूपये प्रति शेअर होता.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >