ट्रेंटचा शेअर १०% 'धडाड' एक दिवसात १४००० बाजार भांडवलाचा चुराडा 'या' कारणामुळे

मोहित सोमण: टाटा समुहाची रिटेल फ्लॅगशिप सबसिडरी (उपकंपनी) ट्रेंटने आपला तिमाही जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर थेट १०% कोसळला आहे. दुपारी २.४६ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ९.१४% घसरण झाल्याने ४०२६.७० रूपये प्रतिशेअर पातळीवर कंपनीचा शेअर पोहोचला आहे. त्यामुळे कंपनीच्या बाजार भांडवलात जवळपास १४००० कोटींच्या बाजार भांडवलात (Market Capitalisation) मध्ये नुकसान झाले आहे. प्रामुख्याने या इक्विटी शेअरमध्ये आज दिवसभरात मोठी घसरण सुरूच असल्याने गुंतवणूकदारांनी सेल ऑफ केल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने तिमाही निकालात जाहीर केल्याप्रमाणे कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १७% वाढ कंपनीने नोंदवली. मार्च २०२५-२६ मधील मार्चमधील ४४६५ कोटी रुपये तुलनेत २०२६-२७ मध्ये ५२२० कोटींवर कंपनीच्या महसूलात वाढ झाल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. तर नऊ महिन्यांच्या आधारावर कंपनीच्या विक्रीतून मिळालेल्या महसूलात २५ मधील १२३६८ कोटी तुलनेत २६ मध्ये १४६०४ कोटींवर वाढ नोंदवली आहे.


कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या तिमाहीत (Q3FY26) वेस्टसाईड या कंपनीच्या ब्रँडने नवी १७ दालने (Showroom) उघडली असून झुडिओ या ब्रँडने एकूण ४८ दालने उघडले आहेत. तर नऊ महिन्यांच्या आधारावर वेस्टसाईडने ३० दालने उघडली असून झुडिओने ८९ दालने उघडली आहेत. तसेच आर्थिक माहितीनुसार, कंपनीच्या कामकाजातून मिळणाऱ्या महसूलात (Revenue from Operations) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आर्थिक वर्ष २०२४ मधील जून महिन्यातील ४०३७.२० कोटी तुलनेत जून २०२५ मध्ये ४८२२.१० कोटीवर वाढ नोंदवली होती. तर इयर ऑन इयर बेसिसवर मार्च २०२४ तिमाहीतील ४२०३.१४ कोटी तुलनेत मार्च २०२५ मध्ये १६९९७.४८ कोटीवर वाढ नोंदवली होती. तर कंपनीच्या एकूण निव्वळ नफ्यात २०२४ जून तिमाहीतील ३४२.१५ कोटी तुलनेत जून २०२५ पर्यंत ४२२.५९ कोटींवर वाढ नोंदवली आहे.


मान्सून लवकर सुरू होऊनही आणि भूराजकीय अडथळे असूनही, तुलनात्मक सूक्ष्म बाजारपेठांसह महसुलात चांगली वाढ झाली आहे. दरम्यान फॅशन पोर्टफोलिओसाठी, Q1FY26 मध्ये 'लाइक फॉर लाइक' वाढ कमी एकेरी अंकात होती. आमच्या संकल्पनांमधील महसूल सहभागातील बदल आमच्या धोरणात्मक योजनांशी मोठ्या प्रमाणात सुसंगत आहे.प्रमुख बाजारपेठांमध्ये भौतिक पोहोच (Geographical Reach) आणि महसुलाचा वाटा वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.


पुढे, आम्ही आमच्या स्टोअर पोर्टफोलिओची गुणवत्ता सुधारत आहोत आणि आम्ही अशा बाजारपेठांमध्ये आमच्या उपस्थितीची घनता जाणीवपूर्वक वाढवत आहोत. व्यवसाय मॉडेलची निवड आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये महसुलाचा वाटा वाढवण्याच्या उद्देशामुळे आम्हाला वाटते की, केवळ तुलनात्मक स्टोअर्सच्या कामगिरीऐवजी तुलनात्मक सूक्ष्म बाजारपेठांमध्ये महसूल वाढ साधणे योग्य ठरेल' अशी प्रतिक्रिया कंपनीने निकालाबाबत बोलताना दिली आहे.


मात्र गुंतवणूकदारांनी मुख्य महसुलाच्या आकड्याऐवजी वाढ मंदावण्याच्या लक्षणांवर अधिक लक्ष केंद्रित केले असल्याचे आज इंट्राडे व्यवहारात स्पष्ट केले आहे. मोठ्या प्रमाणात शेअर्समध्ये सेल ऑफ झाल्याने शेअर्सच्या किंमतीत फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. विश्लेषकांनी समान-स्टोअर विक्रीतील कमकुवतपणा आणि प्रति चौरस फूट महसुलात सतत होणाऱ्या घसरणीकडे लक्ष वेधले असल्याने शेखरला नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. किरकोळ विक्रेत्याच्या स्टोअर्समधील उत्पादकता कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. झुडिओ आणि वेस्टसाइड सारखे लोकप्रिय ब्रँड्स चालवणाऱ्या ट्रेंटने आक्रमकपणे विस्तार केला असला तरी ताज्या कामगिरीवरून अवाढीचा वेग मंदावत असल्याचेही स्पष्ट झाले आहे.


ट्रेंट लिमिटेड ही एक भारतीय रिटेल लाईफस्टाईल कंपनी आहे. टाटा समूहाच्या छत्रछायेखाली असलेल्या कंपनीने वाढ नोंदवली असली तरी ऑपरेटिंग मार्जिनमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. मुंबईत १९९८ मध्ये सुरू झालेल्या ट्रेंट कंपनीच्या मालकीचे वेस्टसाइड, झुडिओ आणि उत्सा यांसारखे फॅशन आणि जीवनशैलीशी संबंधित रिटेल स्वरूपातील ब्रँड आहेत. ही कंपनी संयुक्त उद्यमांद्वारे स्टार बाजार आणि झारा यांसारख्या रिटेल सेल्स चेनदेखील चालवते.


ट्रेंटचा शेअर गेल्या ५ दिवसात ४.६६% कोसळला असून गेल्या १ महिन्यात १.१४%, ६ महिन्यात २६.४५% कोसळला आहे. संपूर्ण वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ४२.१९% घसरण झाली असून इयर टू डेट (YTD) बेसिसवर ५.१९% घसरण झाली होती.

Comments
Add Comment

Udhampur Accident: धमपूरमध्ये टँकरची डंपरला जोरदार धडक लागताच लागली भीषण आग; महामार्गावर थरकाप उडवणारी परिस्थिती

उधमपूर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर काल रात्री उशिरा तेल टँकर आणि

Nepal Flood: नेपाळमध्ये 290 नागरिक संपर्कात नाहीत, पण तिबेटमध्ये...; केंद्र सरकारने दिली ही बातमी

Nepal Flood : नेपाळमध्ये मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, नेपाळ-चीन सीमावर्ती भागात

Maharashtra Weather Update: हवामानात मोठा बदल! उकाडा वाढला, पाऊस गायब; आज तुमच्या भागात सरी कोसळणार की नाही?

मुंबई :  महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांश भागात सध्या हलका ते मध्यम

प्रो गोविंदा २०२६ : आर्यन गोविंदा पथकाने सलग दुसऱ्यांदा मारली बाजी; ७५ लाखांचा धनादेश आणि ट्रॉफीवर कब्जा

मुंबई : दहीहंडी उत्सवाचा थरार आणि खेळाडूंचा जोश अनुभवणाऱ्या 'प्रो गोविंदा सीझन ४' (Pro Govinda Season 4 2026) चा अंतिम सामना अत्यंत

Navi Mumbai News : JNPAची जागतिक भरारी, जगातील टॉप-३० कंटेनर बंदरांमध्ये २१वे स्थान; सात स्थानांची झेप

नवी मुंबई : भारताच्या सागरी व्यापारासाठी महत्त्वाची असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीने (JNPA) जागतिक स्तरावर

Foldable iPhone : Appleचा मोठा धमाका! ९ सप्टेंबरला iPhone 18 Proसह पहिला Foldable iPhone होणार लॉन्च ?

Appleने आपल्या आगामी वार्षिक लॉन्च इव्हेंटची तारीख ९ सप्टेंबर निश्चित केली आहे. कॅलिफोर्नियातील क्युपर्टिनो येथील