Journalist Day 2026 : आज 'मराठी पत्रकार दिन'! ६ जानेवारीलाच हा दिवस का साजरा केला जातो? वाचा या दिनाचा इतिहास

मराठी भाषेतील पहिल्या 'दर्पण' वृत्तपत्राचे जनक आणि आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतींना उजाळा देत आज राज्यभरात 'मराठी पत्रकार दिन' साजरा केला जात आहे. ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्रींनी 'दर्पण'चा पहिला अंक प्रसिद्ध करून महाराष्ट्रात पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली होती, तोच वारसा आजही तितक्याच ताकदीने पुढे सुरू आहे.



१८३२ : जेव्हा मराठी शब्दांनी पाळला 'दर्पण'चा वारसा


आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता वेगाने बदलत असली, तरी १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेले 'दर्पण' हे केवळ वृत्तपत्र नव्हते, तर ते समाजप्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम होते. ६ जानेवारी १८१२ रोजी कोकणातील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या बाळशास्त्रींनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी हे धाडस केले. ब्रिटीश राजवटीत भारतीय समाजाला जागृत करण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे व्यासपीठ निर्माण केले. बाळशास्त्री जांभेकर यांचे जीवनमान केवळ ३४ वर्षांचे (१८१२-१८४६) होते. मात्र, या अत्यंत कमी कालावधीत त्यांनी केवळ पत्रकारितेतच नव्हे, तर शिक्षण, इतिहास आणि समाजसुधारणा क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. त्यांनी दिलेला विचारांचा ठेवा आजही आधुनिक पत्रकारितेसाठी मार्गदर्शक ठरत आहे. त्यांच्या याच अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्मदिन आणि 'दर्पण'चा स्थापना दिन हा 'मराठी पत्रकार दिन' म्हणून साजरा करण्याची प्रथा महाराष्ट्रात रूढ झाली. बाळशास्त्रींनी रोवलेली ही मुहूर्तमेढ आज एका वटवृक्षात रूपांतरित झाली आहे. समाजहिताचा विचार आणि सडेतोड भूमिका ही बाळशास्त्रींची शिकवण आजही पत्रकारांसाठी प्रेरणादायी आहे. आजच्या दिनानिमित्त ठिकठिकाणी बाळशास्त्रींच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.



बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल काही खास गोष्टी



  • १९ व्या शतकाच्या सुरूवातीला जेव्हा भारतामध्ये ब्रिटीश राजवटीची सुरूवात झाली होती तेव्हा त्या काळात बाळशास्त्री जांभेकर हे विद्याविभुषित, पंडीत व्यक्तिमत्त्व काम करत होते.

  • ‘बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती
    मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली.

  • जेम्स ऑगस्टस हिकीच्या इंग्रजी 'बेंगॉल गॅझेट' या साप्ताहिकानंतर बाळशास्त्रींनी ५० वर्षांनी दर्पण हे पहिलं मराठी वृत्तपत्र सुरू केलं.

  • दर्पण ६ जानेवारी १८३२ ला प्रसिद्ध झाला आणि अवघ्या २० वर्षांच्या पण पंडीत असणार्‍या बाळशास्त्री जांभेकरांनी संपादकपदाची धुरा सांभाळली.

  • जांभेकरांनी प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून कोकणातील शिलालेख आणि ताम्रपट यांच्यावर शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली.

  • दर्पण साडेआठ वर्ष चालला. नंतर जुलै १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रसिद्ध झाला होता.

  • बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांचे प्रबोधन केले. समाजातील वर्ण व्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती, अस्पृश्यता, बालविवाह यांवर त्यांनी दर्पणच्या माध्यमातून लिखाण केल्याने त्यांना आद्य समाजसुधारकही म्हटलं जाऊ लागले.

  • बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन आणि ग्रीक या दहा भाषांचे ज्ञान होते. भाषांसोबतच विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र आणि सामान्य ज्ञान या विषयांचीही चांगली जाण होती.

Comments
Add Comment

महिलांसाठी मुंबई देशातील टॉप ५ शहरांमध्ये; बेंगळुरू पुन्हा एकदा अव्वल!

मुंबई  : भारतातील महिलांसाठी राहण्यायोग्य आणि करिअरसाठी पोषक शहरांच्या यादीत मुंबईने आपले स्थान अधिक भक्कम

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई होणार

मुंबई : महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Devendra Fadnavis BMC Election 2026 : उद्धव आणि राज ठाकरेंचा जीव फक्त मुंबईतच का अडकलाय? फडणवीसांनी पुराव्यासह काढला भ्रष्टाचाराचा पाढा, नक्की काय म्हणाले?"

मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)

वाढत्या बेकायदा घुसखोरांमुळे चौफेर सामाजिक संकटांचा धोका - नामवंत तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

मुंबई  : तीन शेजारी देशांमधून भारतात घुसणाऱ्या असंख्य बेकायदा स्थलांतरितांमुळे भारताची सुरक्षा आणि विकास हे

Nitesh Rane : नालासोपारा मध्ये मंत्री नितेश राणे यांच्या प्रचार सभांचा झंझावात!

नालासोपारा : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील

भुयारी मेट्रो मार्गिकेमध्ये नेटवर्कची गैरसोय कायम !

तोडगा काढण्यात एमएमआरसीएल ढिम्म मुंबई : आरे ते कफ परेड या मेट्रो-३ भुयारी मेट्रोच्या संपूर्ण मार्गिकेमध्ये