Wednesday, January 7, 2026

घसरणीचा पाढा शेअर बाजारात सुरुच गुंतवणूकदारांचा नफा बुकिंगकडे कल! सेन्सेक्स २४७.६८ व निफ्टी ३१.३० अंकाने कोसळला

घसरणीचा पाढा शेअर बाजारात सुरुच गुंतवणूकदारांचा नफा बुकिंगकडे कल! सेन्सेक्स २४७.६८ व निफ्टी ३१.३० अंकाने कोसळला

मोहित सोमण: सकाळच्या सत्रात आजही सलग तिसऱ्या सत्रात घसरण कायम राहिली आहे. आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात सेन्सेक्स २४७.६८ व निफ्टी ३१.३० अंकाने घसरला आहे. गुंतवणूकदारांनी आजही सावधगिरीच निश्चित केल्याने आज मोठ्या प्रमाणात नफा बुकिंग होऊ शकते. परिणामी आजही बाजारात कंसोलिडेशनपूर्व फेज कायम राहू शकते. दरम्यान आज दोन्ही बँक निर्देशांकात किरकोळ वाढ झाल्याने बाजारात काहीसा आधार मिळाला. तेल व गॅस शेअर्समध्ये आजही मोठ्या प्रमाणात घसरणीचेच संकेत मिळत आहेत कारण सकाळच्या सत्रात तेल व गॅस निर्देशांकात १.५७% घसरण झाली आहे. सकाळच्या सत्रात वाढ मेटल,आयटी, बँक, हेल्थकेअर निर्देशांकात झाली असून घसरण तेल व गॅस व्यतिरिक्त केमिकल्स, कंज्यूमर ड्युरेबल्स, मिडिया, एफएमसीजी निर्देशांकात झाली आहे. यासह बाजारात युएस व्हेनेझुएला प्रकरणानंतर प्रलंबित तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात गुंतवणूकदार वेट अँड वॉचचे धोरण अंगिकारले जाऊ शकते. कमोडिटी बाजारातही सोन्याच्या व चांदीच्या दरात अस्थिरता अपेक्षित असल्याने आज एकंदर कौल स्थिर घसरणीकडे दिसतो. अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) सकाळच्या सत्रात १% हून अधिक किरकोळ पातळीवर उसळला.

सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ सोभा (२.७३%), आधार हाऊसिंग फायनान्स (२.५३%), हिंदुस्थान कॉपर (२.५०%), एमआरएफ (२.३२%), हिंदुस्थान कॉपर (२.५०%), मदर्सन वायरिंग (१.८३%), वारी एनर्जीज (१.६८%) समभागात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण ज्योती सीएनसी ऑटो (३.५२%), पीव्हीआर आयनॉक्स (३.४६%), वेंटिव हॉस्पिटल (१.७४%), रिलायन्स पॉवर (१.६७%), आनंद राठी वेल्थ (१.६३%), वरूण बेवरेज (१.२४%), वर्धमान टेक्सटाइल (१.१७%), श्रीराम फायनान्स (१.१३%), जेबीएम ऑटो (१.१३%), सुंदरम फायनान्स (१.०९%) समभागात झाली आहे.

Comments
Add Comment