नवी दिल्ली : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. राज्यसभा खासदार असलेल्या सोनिया गांधी गेल्या काही वर्षांपासून आरोग्याच्या समस्यांशी झुंजत आहेत. म्हणूनच त्या नियमित तपासणी आणि उपचारांसाठी वेळोवेळी रुग्णालयात दाखल होत असतात. सोनिया गांधी यांना जून २०२५ मध्येही प्रकृती अस्वस्थ झाल्याने याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या माहितीनुसार, त्यांना पोटाच्या त्रासामुळे रुग्णालयात आणण्यात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही काळापासून सोनिया गांधी यांच्या प्रकृतीत चढ-उतार दिसून येत आहेत. त्याआधीच्या काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशात त्यांची प्रकृती बिघडली होती, तेव्हा त्यांना शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले होते.






