भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी
चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार संसद खेल रत्न क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री रत्नागिरी, सिंधदुर्गचे खा. नारायण राणे यांनी केले.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार भवन सभागृहात दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या निर्देशानुसार संसद खेल रत्न क्रीडा महोत्सव या क्रीडा महोत्सवाची माहिती देऊन हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन केले. तर या क्रीडा महोत्सवाकरिता भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
खा. नारायण राणे सोमवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी वाशिष्ठी डेअरी प्रकल्प आयोजित कृषी महोत्सवाचे उद्घाटन खा. राणे यांच्या हस्ते अन्य मान्यवरांच्या उपस्थित झाले. यावेळी खा. राणे यांनी कृषी महोत्सवाच्या नियोजनाबद्दल वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे प्रशांत यादव यांचे तोंड भरून कौतुक केले. यावेळी त्यांनी दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली.
यावेळी भाजप रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार डॉ. विनय नातू, भाजप नेते प्रशांत यादव, ज्येष्ठ नेते अशोक मयेकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा ढेकणे, महिला प्रदेश सचिव शिल्पा मराठे, देवरुख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, जिल्हा सरचिटणीस प्रणाली सावर्डेकर, अमित केतकर आदी उपस्थित होते.
यावेळी खा. नारायण राणे यांनी संसद खेल रत्न क्रीडा महोत्सवाची माहिती दिली. यामध्ये ७ वर्षीय बालकांचे स्नेहसंमेलन घेणे, खेळणी देणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ११ वर्षांतील कारकिर्दीची नागरिकांना माहिती देणे. तसेच क्रीडा स्पर्धांचे नियोजन करून या स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन केले या संसद खेल महोत्सवाची रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर सोपवण्यात आली. यावर दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी हा क्रीडा महोत्सव यशस्वी करू, असा निर्धार व्यक्त केला.






