Wednesday, January 7, 2026

Nitesh Rane : "उद्धव ठाकरे नाही, तर ते 'उद्धव वाकरे'...नितेश राणेंचा घणाघात!

Nitesh Rane :

अमित साटम यांच्या आडनावावरून केलेल्या विधानामुळे राणे आक्रमक

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या आडनावावरून उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी या वादात उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला असून, त्यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. "ज्यांनी जिहादी मानसिकतेसमोर गुडघे टेकले आहेत, अशांचा कणा आता मोडला असून ते 'ठाकरे' राहिले नसून 'वाकरे' झाले आहेत," अशा शब्दांत राणेंनी प्रहार केला आहे.

कोकणी अस्मितेचा अवमान खपवून घेणार नाही!

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

उद्धव ठाकरेंनी अमित साटम यांच्या आडनावावर केलेल्या टिप्पणीचा समाचार घेताना नितेश राणे म्हणाले की, "नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी आपल्या अहंकारातून एका प्रामाणिक लोकप्रतिनिधीच्या आडनावाची थट्टा उडवली आहे. कोकणामध्ये साटम, परब, सावंत, राणे अशी आडनावे मोठ्या स्वाभिमानाने लावली जातात. जेव्हा तुम्ही एखाद्याच्या आडनावाचा अपमान करता, तेव्हा तुम्ही केवळ त्या व्यक्तीला नाही, तर संपूर्ण कोकणच्या मातीला आणि तिथल्या संस्कृतीला आव्हान देता. ही कोकणी अस्मिता आहे, जी अशा प्रकारचा अपमान कधीही सहन करणार नाही."

'उद्धव वाकरे' शब्दाचा वापर करत टोकदार टीका

यावेळी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख सातत्याने 'उद्धव वाकरे' असा केला. "उद्धव ठाकरेंना आता सत्तेसाठी वाकण्याची सवय झाली आहे. हिंदुत्वाचा विचार सोडून ज्यांनी अल्पसंख्याकांच्या मतांसाठी तडजोड केली, त्यांचा कणा आता ताठ राहिला नाही. त्यामुळे ते आता 'वाकरे' झाले आहेत. आमच्या कोकणी माणसाच्या आडनावांची खिल्ली उडवणाऱ्या या वृत्तीला आता कोकणचा वचक आणि हिसका काय असतो, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे," असे राणे यांनी ठणकावून सांगितले.

मतपेटीतून 'हिशोब' चुकता करण्याचा इशारा

मुंबईत राहणाऱ्या कोकणी बांधवांना आवाहन करताना नितेश राणे म्हणाले की, "हा अपमान विसरू नका. मुंबईच्या विकासामध्ये आणि कोकणच्या जडणघडणीत साटम आणि इतर कोकणी कुटुंबांचे मोठे योगदान आहे. अमित साटम यांच्या पाठीशी संपूर्ण कोकणी जनता खंबीरपणे उभी आहे. या अपमानाचा बदला आता मतपेटीतून घेतला जाईल. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंना कोकणची जनता त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही."

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >