मोहित सोमण: मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड (Motilal Oswal Mutual Fund) कंपनीने आज नव्या एनएफओची (New Fund Offer NFO) घोषणा केली आहे. मोतीलाल ओसवाल डायव्हर्सीफाईड इक्विटी फ्लेक्सिकॅप पॅसिव्ह फंड ऑफ फंड (Motilal Oswal Diversified Equity Flexicap Passive Fund of Funds) हा नवा एनएफओ फंड ओपन एडेंड असून २ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल असे कंपनीने लाँचिग दरम्यान स्पष्ट केले आहे. विशेषतः ज्यांना विविधीकरणासह दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा फंड योग्य ठरू शकतो असे कंपनीने यावेळी म्हटले. मिड,स्मॉल, लार्ज कॅप या तिन्ही प्रकारच्या शेअरचा समान महत्व देणारा हा पॅसिव्ह फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतो. इंडेक्स फंड प्रमाणे दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करण्यासाठी वापरलेल्या सोप्या रणनीतीचा वापर या एनएफओ अंतर्गत कंपनी करणार आहे. याविषयी बोलताना,'या योजनेचा गुंतवणुकीचा उद्देश, इक्विटी आणि इक्विटी-संबंधित साधनांच्या ईटीएफ/इंडेक्स फंडांसारख्या पॅसिव्ह फंडांमध्ये प्रामुख्याने गुंतवणूक करून, सगळ्या मार्केट कॅपिटलायझेशन विभागांमध्ये विविधीकृत संधी (Diversified Opportunity) उपलब्ध करून देत, दीर्घकालीन वाढ/भांडवली मूल्यवृद्धी करणे हा आहे. तथापि, योजनेचा गुंतवणुकीचा उद्देश साध्य होईलच याची कोणतीही खात्री किंवा हमी दिली जाऊ शकत नाही.' असे कंपनीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.
मोतीलाल ओसवाल डायव्हर्सिफाइड इक्विटी फ्लेक्सिकॅप पॅसिव्ह FoFs, इक्विटी गुंतवणूकदारांना भेडसावणाऱ्या एका सामान्य आव्हानाला सामोरे जाण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे कोणत्या मार्केट-कॅप सेगमेंटमध्ये आणि कधी गुंतवणूक करावी हे ठरवणे आहे असे कंपनीने बोलताना स्पष्ट केले. ऐतिहासिकदृष्ट्या,लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप्समधील नेतृत्व बाजाराच्या चक्रानुसार बदलत राहिले आहे आणि कोणत्याही एका सेगमेंटने दीर्घकाळ नेतृत्व टिकवून ठेवलेले नाही. या बदलांचा अंदाज लावणे कठीण असू शकते ज्यामुळे गुंतवणूकदार अनेकदा अलीकडील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेगमेंटमध्ये गुंतवणूक करतात किंवा सेगमेंटमधून मुदतपूर्व बाहेर पडतात.' असे म्हटले.
दरम्यान या एनएफओत गुंतवणूक करण्यासाठी किमान ५०० रूपयांची लंपसंम व १ रूपयाच्या पटीने पुढे गुंतवणूक करणे अनिवार्य असल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. या एनएफओ ऑफरसाठी १% एक्सिट लोड निश्चित करण्यात आल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले. जर गुंतवणूकदारांनी १५ दिवस किंवा तत्पूर्वी गुंतवणूक काढल्यास १% एक्सिट लोड गुंतवणूकीवर आकारला जाईल असे कंपनीने स्पष्ट केले. अरथ
ही योजना एक साधी पण सुव्यवस्थित रणनीती अवलंबते ती म्हणजे लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप सेगमेंटमध्ये समान वाटपाने (प्रत्येकी एक-तृतीयांश) सुरुवात करणे. वाटपाचा दर तिमाहीत आढावा घेतला जातो आणि जर कोणताही सेगमेंट त्याच्या लक्ष्यित वजनापेक्षा किमान ५% ने विचलित झाला तरच त्याचे पुनर्संतुलन केले जाते. ही कार्यप्रणाली पोर्टफोलिओला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सेगमेंटमधून आपोआप गुंतवणूक कमी करण्यास आणि कमी वजनाच्या सेगमेंटमध्ये पुन्हा वाटप करण्यास अनुमती देते, ज्यामुळे बाजाराच्या अंदाजांवर किंवा ऐच्छिक निर्णयांवर अवलंबून न राहता 'स्वस्त असताना खरेदी करा, महाग असताना विक्री करा' हे तत्त्व अंगीकारले जाते.यासह जर एमओएमएफच्या योजनांमध्ये स्विच केल्यानंतरहि एक्झिट लोड लागू होईल. योजनेतील पर्यायांमध्ये स्विच करण्यासाठी कोणताही लोड आकारला जाणार नाही असेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले. माहितीनुसार योजनेतील प्लॅन्समध्ये स्विचआउट केल्यास कोणताही एक्झिट लोड आकारला जाणार नाही.
एमओएएमसीच्या संशोधनानुसार, मार्केटकॅप प्रभावाची सायकल (स्थितीय चक्रे) कालांतराने बदलली असतात. ज्यात चढउतार अथवा तणावाच्या काळात लार्ज कॅप्समध्ये अनेकदा सापेक्ष स्थिरता दिसून येते तर आर्थिक विस्तार आणि पुनर्प्राप्तीच्या टप्प्यांमध्ये मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये मोठी वाढ दिसून आली आहे. एक वैविध्यपूर्ण म्हणून या पोर्टफोलिओत चांगले वैविध्यपूर्ण एक्सपोजर मिळते. इक्विटी बाजारात मोठ्या प्रमाणात मिड आणि स्मॉल कॅप्सने आतापर्यंत चांगला परतावा दिला आहे. आकडेवारीनुसार या कंपन्या एकूण बाजार भांडवलाचा (Market Capitalisation) वाढता वाटा दर्शवत आहेत आणि अलीकडच्या वर्षांत उच्च अस्थिरतेसह मोठा नफा वाढ दर्शवत आहेत.
याविषयी आपले मत मांडताना मोतीलाल ओसवाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (MOAMC) चे पॅसिव्ह फंड्सचे व्यवसाय प्रमुख, प्रतीक ओसवाल म्हणाले आहेत की,'मार्केट-कॅप नेतृत्व सतत बदलत असते आणि कोणता विभाग पुढे चांगली कामगिरी करेल याचा अंदाज लावणे आव्हानात्मक आहे. मोतीलाल ओसवाल डायव्हर्सिफाइड इक्विटी फ्लेक्सिकॅप पॅसिव्ह फंड ऑफ फंड्सची रचना लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप्समध्ये समान वाटप करून हा अंदाजेपणा दूर करण्यासाठी केली आहे. हे गुंतवणूकदारांना एका पारदर्शक, शिस्तबद्ध चौकटीद्वारे बाजारातील बदलांमध्ये आपोआप सहभागी होण्याची संधी देते, तर हे धोरण फंड व्यवस्थापकाच्या विवेकबुद्धीच्या अधीन असते.'
उपलब्ध माहितीनुसार, स्वप्नील मायेकर इक्विटी घटकासाठी आणि राकेश शेट्टी डेट घटकासाठी फंडाचे व्यवस्थापन करणार आहेत. उत्पादन अथवा एनएफओ त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही याबद्दल शंका असल्यास गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा असेही आवाहन कंपनीकडून करण्यात आले आहे.






