आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे नवीन वेळापत्रक?

भारतात खेळण्यास नकार देऊन बांगलादेशचा बीसीसीआयला दणका


नवी दिल्ली : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ बांगलादेशमुळे नव्याने घडामोडी होणार आहेत. याआधी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुरुषांचा टी-२० वर्ल्ड कप २०२६ हा ७ फेब्रुवारीपासून सुरू होऊन ८ मार्च रोजी अंतिम सामना होईल. भारत आणि श्रीलंका या दोन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली हा बहुचर्चित स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.


बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे महत्त्वाची मागणी केली असून, भारतातील आपले सर्व सामने श्रीलंकेत हलवावेत, अशी विनंती केली आहे. या मागणीवर आयसीसीने गांभीर्याने दखल घेतली असून, चेअरमन जय शहा यांच्या नेतृत्वाखाली नव्या वेळापत्रकावर काम सुरू करण्यात आल्याचे समजते. ही मागणी अशा वेळी पुढे आली आहे, जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सध्याची परिस्थिती लक्षात घेता कोलकाता नाईट रायडर्स संघाला मुस्तफिजूर रहमानला रिलीज करण्यास सांगितले होते. भारताकडून बांगलादेशचा बंगालमध्ये आक्षेप असल्याने त्यांना मुंबईतच सर्व सामने खेळण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता आहे.


भारताबाहेर सामने घेण्याची मागणी


बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय कोणताही वाद वाढवण्यासाठी नसून, केवळ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सुरक्षेच्या दृष्टीने घेतला आहे. त्यामुळे आयसीसीने परिस्थितीची गंभीरता ओळखून बांगलादेशचे सर्व सामने भारताबाहेर, सुरक्षित ठिकाणी आयोजित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. श्रीलंका हा स्पर्धेचा सह-यजमान असला तरी, सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचे सर्व ग्रुप स्टेज सामने भारतातच होणार आहेत. यामध्ये चारपैकी तीन सामने कोलकात्यात, तर एक सामना मुंबईत खेळवण्यात येणार आहे.


बीसीसीआयसह आयसीसीसमोर पेच


बीसीसीआयने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र सूत्रांच्या मते, विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक अवघ्या महिनाभर आधी बदलणे अत्यंत कठीण आहे. अचानक सर्व बुकिंग बदलणे, नवीन मिळविणे आणि त्याप्रमाणे शेड्यूल करणे कठीण आहे. यापूर्वी पाकिस्तानचे सामने हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. आता बांगलादेशनेही त्याच धर्तीवर मागणी केली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, यामुळे भविष्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो.


खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा केंद्रस्थानी


रविवारी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीत भारतात होणाऱ्या सामन्यांदरम्यान खेळाडूंच्या सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सध्याची परिस्थिती आणि बांगलादेश सरकारकडून मिळालेल्या सल्ल्याचा विचार करता, सध्या भारतात दौरा करणे संघासाठी सुरक्षित नाही, असा निष्कर्ष बोर्डाने काढला. आधी जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार, बांगलादेशला कोलकात्यात तीन तर मुंबईत एक सामना खेळायचा होता.


बीसीसीआयला किती नुकसान सोसावे लागेल?


आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला बीसीसीआयने खेळण्यापासून रोखल्याचा आरोप करत, आता बांगलादेशने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील आपले सर्व सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी केली आहे. या निर्णयामुळे बीसीसीआयला कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीसीसीआयला सात ते ३० कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परंतु, एकंदरीत बीसीसीआयच्या उत्पन्नाचा आवाका पाहता ही रक्कम एकदम चिल्लर आहे. जर आयसीसीने ही मागणी मान्य केली, तर बीसीसीआयच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल. कारण आयसीसी स्पर्धांमधून तिकिटे, प्रसारण आणि केंद्रीय प्रायोजकत्व महसूल थेट बीसीसीआयकडे जात नाही. तर मैदानावरील स्थानिक जाहिराती, तिकीटे घेणाऱ्या प्रेक्षकांना दिल्या जाणाऱ्या खानपानाच्या सेवेतून मिळणारा महसूल आदी उत्पन्नच बीसीसीआयला मिळतो. मुळात पहिल्या फेरीत बांगलादेशचे वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंडविरुद्ध तीन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आणि एक सामना नेपाळविरोधात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. या सामन्यांतून केवळ इग्लंडच्या सामन्यातून बीसीसीआयला या हॉस्पिटॅलिटीमधून उत्पन्न मिळण्याची आशा होती.

Comments
Add Comment

न्यूझीलंडचा ५० धावांनी विजय

शिवम दुबेची तुफानी खेळी व्यर्थ शाखापट्टणम : विशाखापट्टणम येथे झालेल्या चौथ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने

Ajit Pawar Passed Away : अजित पवारांच्या अपघाती निधनावर क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन (MOA) चे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली आणि दुःखद

आयसीसी क्रमवारीत भारताचे वर्चस्व, अभिषेकचे अव्वल स्थान भक्कम; तर सूर्याची वादळी एन्ट्री

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या ताज्या टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंचे निर्विवाद

अवघ्या १० षटकांत किवींचा उडवला धुव्वा, सूर्या-अभिषेकच्या वादळी खेळीने मालिका खिशात

गुवाहाटी  : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात क्रिकेट विश्वाला अचंबित करणारा विजय

T20I : गुवाहाटीत रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड लढत, भारताला मालिका जिंकण्याची संधी

गुवाहाटी  : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा महत्त्वपूर्ण सामना रविवारी

आयसीसीचा बांगलादेशला दणका, टी-२० विश्वचषकातून पत्ता कट, स्कॉटलंडचा प्रवेश

मुंबई  : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अखेर बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या आडमुठ्या भूमिकेवर कठोर कारवाई केली