मोहित सोमण: एचएसबीसी पीएमआय सर्विस इंडेक्स (HSBC India Services PMI Index) अहवालाप्रमाणे, उत्पादन क्षेत्राला (Manufacturing Sectors) मागे टाकत सेवा क्षेत्राने दमदार कामगिरी नोंदवली आहे. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस डिसेंबरमध्ये सेवा क्षेत्राने मोठी कामगिरी केल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्राने डिसेंबरमध्ये तीन वर्षातील सर्वाधिक कामगिरी नोंदवली असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. त्यामुळे अहवालात दिलेल्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर महिन्यातील घसरलेल्या ५६.९ तुलनेत डिसेंबर महिन्यात ५९ पातळीवर वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, सेवा क्षेत्राने वाढत्या मागणीमुळे आपले दीर्घकालीन ५३.८ सरासरी वाढ कायम ठेवली आहे.

अर्थातच सेवा व्यवसायांच्या इनपूट खर्चात वाढ झाली असली तरी वाढत्या देशांतर्गत व परदेशी मागणीमुळे आउटपुट किंमतीमध्येही वाढ झाली आहे. अहवालातील माहितीनुसार, त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्राने ३ वर्षातील सर्वाधिक कामगिरी केली. निरिक्षणानुसार इनपूट किंमतीत अथवा खर्चात संथ वाढ झाली असली तरी २०२३ मध्यावर त्यात सुधारणा झाली. डिसेंबर महिन्यात निश्चितच या किंमतीत वाढ झाली असली तरी सेवा क्षेत्रातील मार्जिनमध्येही वाढ झाली आहे. किंबहुना कॉर्पोरेट क्षेत्राच्या नफ्यात (Profitability) इयर ऑन इयर बेसिसवर तीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर वाढ झाली आहे.
डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संख्येत वाढ होत असताना सातत्याने मागणीत वाढ होत असल्याचेही अहवालात स्पष्ट केले गेले. अहवालाने भविष्यातील सेवा क्षेत्रातील मागणीत व व्यवसायात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. अहवालाच्या मते, या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय निर्देशांकासोबत सेवा पीएमआय निर्देशांक एकत्र केल्यास अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे एकत्रित चित्र मिळते. यानुसार एकूण उत्पादन, नवीन ऑर्डर आणि भविष्यातील अपेक्षांमध्ये वाढ झाली आहे कच्च्या मालाच्या किमतींमधील एकूण वाढ मंदावली परंतु तयार मालाच्या किमती वाढल्या, ज्यामुळे नफ्याचे प्रमाण सुधारले असून उत्पादक आणि सेवा प्रदात्यांमधील अनेक समानता आणि फरक लक्षात घेण्यासारखे आहेत.
अहवालातील माहितीनुसार, समानतेच्या बाबतीत, उत्पादक आणि सेवा प्रदाते (Service Providers) दोघेही कच्च्या मालाच्या खर्चात घट अनुभवत आहेत. परंतु डिसेंबरच्या आकडेवारीनुसार, नवीन ऑर्डरच्या वाढीच्या गतीच्या बाबतीत सेवा प्रदात्यांनी उत्पादकांपेक्षा जास्त मागणी अनुभवली यामुळेच, उत्पादकांनी तयार मालाच्या किमतींमधील वाढ कमी केली असतानाही, सेवा प्रदात्यांना किमती वाढवणे शक्य झाले. परिणामी, सेवा प्रदात्यांसाठी कॉर्पोरेट नफा अधिक वेगाने वाढला आणि आता तो उत्पादकांच्या नफ्याच्या जवळपास पोहोचला आहे असे अहवालाने म्हटले.
सर्विस पीएमआय निर्देशांकाने आपले मत नोंदवताना संस्थेने म्हटले आहे की,'आम्ही आर्थिक वर्ष २५ मध्ये जीडीपी वाढ ६% वार्षिक दराने वाढण्याचा अंदाज वर्तवत आहोत, तर आर्थिक वर्ष २४ मध्ये ही वाढ ६.९% होती. या घसरणीमागील बहुतेक कारणे सांख्यिकीय असण्याची शक्यता आहे. (उदाहरणार्थ, डिफ्लेटरचे सामान्यीकरण आणि बेस इफेक्ट) त्यामुळे जमिनीवरील प्रत्यक्ष वाढ कदाचित तितकी मंदावणार नाही. तेलाच्या घसरलेल्या किमती आणि पतवाढीतील संरचनात्मक वाढ भारताच्या जीडीपी वाढीसाठी सहाय्यक ठरली आहे, तर कमकुवत कृषी उत्पादन एक अडथळा ठरले आहे. हे घटक कोणत्या दिशेने जातात यावर पुढील वर्षात अर्थव्यवस्थेचा आकार आणि स्वरूप निश्चित होण्याची शक्यता आहे.'






