Wednesday, January 7, 2026

घर खरेदीदारांना मिळणार प्रकल्पाची अद्ययावत माहिती

घर खरेदीदारांना मिळणार प्रकल्पाची अद्ययावत माहिती

मुंबई : जर आपल्या शहरामध्ये एखादा गृह प्रकल्प सुरू असेल आणि त्या गृह प्रकल्पामध्ये घर खरेदीदारांना घराची खरेदी करायचे असेल, तर घर खरेदीदार प्रकल्पाची माहिती जाणून घेऊन त्या प्रकल्पामध्ये गुंतवणूक करतात. मात्र त्यांना गृह प्रकल्पाची माहिती मिळवणे कठीण जाते. ही अडचण दूर करण्यासाठी आणि ग्राहकाला सक्षम करणारे त्रैमासिक आणि वार्षिक प्रपत्रे संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात येते. या प्रमाणात आता वाढ झाली आहे. ही प्रपत्रे संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचे प्रमाण आता ०.०२ टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर गेले असल्याची माहिती महारेरामार्फत देण्यात आली आहे.

विकासकांना जी माहिती उपलब्ध आहे, ती सर्व माहिती सार्वजनिकरीत्या घर खरेदीदारांना आणि ग्राहकालाही उपलब्ध असायलाच हवी. यामुळे ग्राहकाला माहितीपूर्ण आणि विश्वासार्ह माहितीच्या आधारे गुंतवणुकीबाबत यथोचित निर्णय घेता येईल. यासह ग्राहकाला घरबसल्या विनासायास प्रकल्पाची सद्यस्थिती आणि सत्यस्थिती समजून घेता येईल. यासाठीच विनियामक तरतुदीनुसार तिमाही (यात प्रपत्र १,२ आणि ३ सादर करणे अपेक्षित) (क्यूपीआर) आणि वार्षिक प्रपत्रे (प्रपत्र-५) सादर करण्याचा आग्रह हा ग्राहकाला सक्षम करण्यासाठीच आहे.

यामुळेच घर खरेदीदारांना सक्षम करणारी त्रैमासिक प्रगती अहवालाची माहिती ८० टक्के गृहनिर्माण प्रकल्पांनी महारेराच्या संकेतस्थळावर अद्ययावत केली आहे. याबाबतचे संनियंत्रण महारेराने सुरू केले तेव्हा हे प्रमाण फक्त ०.०२ टक्के असे नगण्य होते, अशी माहिती महारेरामार्फत ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >