मोहित सोमण: आजही भूराजकीय अस्थिरतेची मालिका सुरु राहिल्याने सोने व चांदीत रॅली झाली आहे. सोने चांदीत अस्थिरतेचा चटका बसत असताना आजही जवळपास १% वाढ सोन्यात व चांदीत २% इंट्राडे वाढ झाली आहे. त्यामुळे 'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार,२४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ६० रुपये, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५५ रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४५ रुपयांनी वाढ झाली आहे. ज्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १३८८२ रूपये, २२ कॅरेटसाठी १२७२५ रूपये, १८ कॅरेटसाठी १०४१२ रूपयांवर पोहोचले आहेत. २४ कॅरेट प्रति तोळा किंमतीत ६०० रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ५५० रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत ४५० रूपयाने वाढ झाली. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १३८८२० रूपये, २२ कॅरेटसाठी १२७२५० रूपये, १८ कॅरेटसाठी १०४१२० रूपयांवर पोहोचले आहेत.
आज कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Mutli Commodity Exchange MCX) सोन्याच्या दरात संध्याकाळपर्यंत ०.२४% वाढ झाल्याने दरपातळी १३८४४५ रूपयांवर व्यवहार करत आहे. तर मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम दर संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, २४ कॅरेटसाठी १३९९७ रुपयांवर, २२ कॅरेटसाठी १२८३० रुपयांवर, १८ कॅरेटसाठी १०७०० रूपयांवर पोहोचले आहेत. जागतिक स्तरावरील सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३९% वाढ झाली. त्यामुळे प्रति डॉलर दर ४४६९.६५ औंसवर गेली आहे. जागतिक स्तरावरील सोन्याचे मानक (Standard) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युएस गोल्ड स्पॉट दरात ०.२४% वाढ झाली ज्यामुळे हे दर प्रति डॉलर ४४६०.०८ औंसवर पोहोचले आहेत.
गेल्या सत्रात सोने २.७% पातळीपेक्षा अधिक पातळीवर उसळले होते. गेल्या आठवड्यात सोन्याने ४५४९ औंस प्रति डॉलरचा उच्चांक गाठला होता. त्यानंतर काही प्रमाणात स्थिरता आल्याने नफा बुकिंग झाले. युएस व्हेनेझुएला यांच्यातील वाढत्या संघर्षाचा फटका आजही बसला असल्याने सोने आणखी महागले आहे. भौतिक सोन्यासह गुंतवणूकदारांनी ईटीएफ व स्पॉट फ्युचर बेटिंगमध्ये वाढ केल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची मागणी वाढली होती.
आजच्या बाजारातील सोन्याच्या परिस्थितीवर विश्लेषण करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमती सकारात्मक राहिल्या, आणि एमसीएक्स (MCX) वर त्या ६०० रूपयाने वाढून सुमारे १३८७०० रूपयांपर्यंत पोहोचल्या,कारण CME वरील सोन्याचे दर ४४७५ डॉलरच्या पातळीकडे वर चढले आहे. उच्च पातळीवरून काही प्रमाणात नफावसुली झाली, ज्यामुळे किमती Comex वर ४४५० डॉलरच्या आणि एमसीएक्सवर १३८२०० पातळीच्या जवळ आल्या, परंतु एकूण कल सकारात्मक राहिला. नव्याने निर्माण झालेल्या भूराजकीय तणावामुळे जोखीम घेण्याची प्रवृत्ती सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करण्याच्या बाजूने आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाची सीमा ओलांडल्याच्या आणि तेथील नेतृत्वाशी संबंधित वाढलेल्या सतर्कतेच्या बातम्यांमुळे जागतिक अनिश्चिततेत भर पडली आहे. या घडामोडींमुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कायम आहे. सोन्याच्या किमती अस्थिर राहण्याची शक्यता आहे, परंतु त्यांचा कल तेजीकडे राहील, आणि नजीकच्या काळात व्यापार श्रेणी १३७२०० ते १४२००० दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.'
चांदीच्या दरातही मोठी वाढ!
चांदीच्या दरातही तुफान वाढ झाली आहे.'गुडरिटर्न्स ' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात ५ रुपयांनी वाढ झाली असून प्रति किलो दरात ५००० रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २५३ व प्रति किलो दर २५३००० रूपयांवर पोहोचला आहे. एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.४६% वाढ झाल्याने दरपातळी २४९७५१.०० रूपयांवर पोहोचली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीच्या सरासरी दरात प्रति १० ग्रॅम २५३० व प्रति किलोत २५३००० रूपयांवर दरपातळी पोहोचली आहे.
जागतिक स्तरावर चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत १.८४% वाढ झाली.यासह बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की सोन्याच्या तसेच चांदीच्या किमतींमध्ये मोठ्या प्रमाणात चांदीच्या रॅलीत वाढ होण्याचे एक मुख्य कारण जागतिक भूराजकीय तणाव आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील अलीकडील लष्करी घडामोडींनंतर, आता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत.आज प्रसिद्ध झालेल्या ऑगमोंट बुलियनच्या साप्ताहिक अहवालानुसार, जागतिक पुरवठा साखळीशी संबंधित सरकारी निर्णय आणि वाढत्या भूराजकीय जोखमींमुळे चांदीच्या किमतीत आणखी वाढ होतच आहे. यासह अहवालातील माहितीनुसार इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव, अमेरिका-व्हेनेझुएला संबंधांमध्ये सुरू झालेला संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्ध या कारणामुळे मुद्द्यांमुळे अनिश्चितता व अस्थिरता वाढली आहे. त्यामुळे अहवालातील माहितीनुसार अशा वातावरणात, गुंतवणूकदार चांदीकडे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहत आहेत.






