मोहित सोमण: गॅबियन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (Gabion Technologies Limited) या कंपनीचा एसएमई प्रवर्गातील छोटा आयपीओ आजपासून बाजारात दाखल झाला आहे. पहिल्याच दिवशी सबस्क्रिप्शन फुल झाल्याचे पहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी आयपीओत जबरदस्त खरेदी केल्याने आयपीओला तब्बल ४४.६७ पटीने सबस्क्रिप्शन मिळाले आहे. एकूण पब्लिक इशूपैकी रिटेल गुंतवणूकदारांकडून ६०.१९ पटीने, पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (QIB Ex Anchor) १.४७ पटीने, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून (NII Investors) ६५.८८ पटीने मिळाले असल्याचे आकडेवारीत स्पष्ट झाले आहे. अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीने कालच ८.२८ कोटी रुपयांची उभारणी केली असताना आज अँकर गुंतवणूकदारांकडून कंपनीला एकूण १०२२४०० शेअरसाठी १०२२४०० शेअरला संपूर्ण बिंडींग पूर्ण झाले आहे. तर पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून कंपनीला ६८३२०० शेअर्ससाठी १००४८०० पातळीवर बिडींग मिळाले आहे. विना संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून ५१३६०० शेअरसाठी ३३८३२६०० चे बिडींग मिळाले असून रिटेल गुंतवणूकदारांकडून २३९६८०० शेअरसाठी १०७०६४६०० चे बिडींग मिळाले आहे.
एकूण २९.१६ कोटी मूल्यांकन असलेला हा आयपीओ ०.३६ कोटी शेअर्सचा फ्रेश इशू असल्याचे कंपनीने आपल्या फायलिंगमध्ये स्पष्ट केले होते. आज ६ जानेवारी ते ९ जानेवारी पर्यंत गुंतवणूकदारांसाठी आयपीओ बाजारात उपलब्ध असेल. कंपनीने प्राईज बँड ७६ ते ८१ रूपये प्रति शेअर निश्चित केली होती. GYR Capital Advisors Private Limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Kfin Technologies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे तर मार्केट मेकर म्हणून Giriraj Stock Broking Pvt Ltd कंपनी आयपीओसाठी कार्य करेल.
१०९ कोटी बाजार भांडवल (Market Capitalisation) असलेल्या कंंपनीने एकूण ३६००००० शेअर विक्रीसाठी बाजारात आणले होते. त्यातील मार्केट मेकरसाठी १८०८०० शेअर्स राखीव ठेवण्यात आले होते. १३ जानेवारीला हा शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) होणार आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या प्रवर्तकांचे भागभांडवल (Stake holding) संपूर्ण १००% आहे ते आयपीओनंतर कमी होणार आहे.
कंपनीच्या आर्थिक स्थितीवर भाष्य केल्यास, कंपनीच्या महसूलात यापूर्वी इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) ४% घसरण झाली असून कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) १४% वाढ झाली आहे. एकूण उत्पन्नात २०२४-२५ दरम्यान मार्च २०२४ मधील १०४.९७ कोटी तुलनेत १०१.१७ कोटींवर वाढ झाली होती. तर कंपनीच्या करोत्तर नफ्यात मार्च २०२४ मधील ५.८२ कोटी तुलनेत मार्च २०२५ मध्ये ६.६३ कोटींवर वाढ झाली आहे. ईबीटा (EBITDA) मार्चमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर मात्र १३.१६ कोटीवरुन १०.७६ कोटींवर घसरला होता. कंपनीचा प्री आयपीओ ईपीएस (Earning per share EPS) ६.६५ रूपये होता जो आयपीओनंतर ४.७५ रूपये होईल. कंपनीचा आरओसीई (Return on Capital Employed ROCE) १९.१७% आहे तर डेट टू इक्विटी गुणोत्तर (Debt to Equity Ratio) २.१२ आहे तर कंपनीचे करोत्तर मार्जिन ६.६०% आहे तर प्राईज टू बूक व्हॅल्यु ३.६७ रूपये आहे.
फेब्रुवारी २००८ मध्ये स्थापन झालेली गॅबियन टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड कंपनी स्टील गॅबियन्सचे उत्पादन करते आणि जागतिक स्तरावर जिओसिंथेटिक्स, जिओटेक्निकल अभियांत्रिकी आणि भूमी सुधारणा सेवा प्रदान करते.ही कंपनी डबल ट्विस्टेड हेक्सागोनल स्टील वायर मेश गॅबियन्स, डिफेन्स गॅबियन्स, पीपी रोप गॅबियन्स, हाय-टेन्साइल रॉकफॉल प्रोटेक्शन नेटिंग्ज, रीइन्फोर्स्ड जिओमॅट आणि हाय स्ट्रेंथ फ्लेक्सिबल जिओग्रिड्सचे उत्पादन करते. विशेषतः कंपनीचा ग्राहक वर्ग जिओसिंथेटिक्स, जिओटेक्निकल अभियांत्रिकी आणि भूमी सुधारणा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सरकारी संस्था, कंत्राटदार, खाजगी ग्राहक, सल्लागार आणि प्राधिकरणे आहेत. ही कंपनी पायाभूत सुविधा, संरक्षक भिंती, उतार, भूस्खलन संरक्षण, सिंचन आणि खाणकाम यासह विविध क्षेत्रांना सेवा देते.
आतापर्यंत कंपनीने एकूण १२७६०.५९ लाख रुपयांच्या कंत्राट मूल्याचे ७६ प्रकल्प पूर्ण केले आहेत ज्यामध्ये रस्त्यांवरील ३६, रेल्वेवरील १२, खाजगी व्यावसायिक क्षेत्रातील ८, ऊर्जा क्षेत्रातील ९, खाणकामातील ३, विमानतळांवरील ३, संरक्षण क्षेत्रातील ३ आणि जलसंपदा क्षेत्रातील २ प्रकल्पांचा समावेश आहे.
कंपनीच्या एकूण प्रोडक्ट पोर्टफोलिओत गॅबियन बॉक्स, रिव्हेट मॅट्रेसेस, डीटी मेश नेटिंग, सॅक गॅबियन्स, टेलमेश फॅशिया युनिट्स, हाय-टेन्साइल रॉकफॉल प्रोटेक्शन नेटिंग, 3D जिओ-कंपोझिट जिओमॅट्स, रॉकफॉल बॅरियर्स, जिओटेक्स्टाइल्स, जिओबॅग्स, एचडीपीई जिओमेम्ब्रेन्स, पीईटी जिओग्रिड्स, पीपी जिओग्रिड्स, ज्यूट जिओटेक्स्टाइल्स, कॉयर मॅट्स, 3D ड्रेन शीट्स, काँक्रीट जिओमॅट्स आणि स्टील अँकर्स यांचा समावेश आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी खेळत्या भांडवलाची (Working Capital Requirments), भांडवली खर्चासाठी (Capital Expenditures), व दैनंदिन कामकाजासाठी (General Corporate Purposes) करणार असल्याचे समजते.






