मोहित सोमण: कोल इंडिया या पीएसयु कंपनीची उपकंपनी (Subsidiary) असलेल्या भालम कोकिंग कोल लिमिटेड (Bharat Coking Coal Limited) या बहुप्रतिक्षित आयपीओचे ९ जूनपासून आगमन होणार आहे. याच धर्तीवर कंपनीने २१ ते २३ रूपये प्रति शेअर प्राईज बँड निश्चित केल्याची घोषणा केली आहे.१०७१.११ कोटी रुपये मूल्यांकनाच्या हा आयपीओ ९ ते १३ जून कालावधीत गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असणार आहे. संपूर्णपणे हा ऑफर फॉर सेल (OFS) प्रकारचा सेल असणार आहे. कंपनीचा आयपीओत कुठलाही फ्रेश इशू असणार नाही. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रिटेल अथवा किरकोळ गुंतवणूकदारांना किमान १३८०० रुपयांची (६०० शेअर) गुंतवणूक करणे अनिवार्य असणार आहे. एकूण १५ शेअर्सचा हा समभागाचा गठ्ठा (Shares Lot) असणार आहे. IDBI Capital Market Services Limited कंपनी आयपीओसाठी बुक लिडिंग मॅनेजर म्हणून काम करणार असून Kfin Technologies Limited कंपनी आयपीओसाठी रजिस्ट्रार म्हणून काम करणार आहे.
एकूण हा पब्लिक इशू (Public Issue) ४६५७००००० शेअर्सचा असणार आहे ज्यांचे मूल्यांकन १०७१ कोटी असेल. बीएसई व एनएसईवर हा शेअर सूचीबद्ध (Listed) होणार आहे. आयपीओआधी कंपनीचे भागभांडवल (Market Capitalisation) १०७११.१० कोटी रूपये आहे. पात्र गुंतवणूकदारांसाठी समभागाचे (Stocks) वाटप १४ जानेवारीला होणार असल्याचे समजत आहे. एकूण आयपीओतील गुंतवणूकीपैकी पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Qualified Institutional Investors/Buyers (QIB) ५०% वाटा, तर रिटेल गुंतवणूकदारांसाठी ३५% वाटा, विना संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (Non Institutional Investors NII) १५% वाटा गुंतवणूकीसाठी उपलब्ध असेल. राष्ट्रपती, कोळसा मंत्रालय भारत सरकार, कोल इंडिया लिमिटेड हे कंपनीचे प्रवर्तक (Promoter) आहेत.
आर्थिक स्थितीत पाहिल्यास, एकूण उत्पन्नात (Total Income) तिमाही बेसिसवर (Quarter on Quater QoQ) मार्च २०२५ मधील १४४०१.६३ कोटी तुलनेत ६३११.५१ कोटींवर घसरले आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) तिमाही बेसिसवर मार्च २०२५ मधील १२४०.१९ कोटींच्या तुलनेत या सप्टेंबर २०२५ मध्ये १२३.८८ कोटींवर घसरण झाली आहे. कंपनीच्या ईबीटातही (EBITDA) इयर ऑन इयर बेसिसवर घसरण झाली आहे. मार्च २०२५ मध्ये असलेल्या २३५६.०६ कोटींच्या तुलनेत या सप्टेंबर २०२५ पर्यंत ४५९.५३ कोटींवर घसरण झाली आहे.
आकडेवारीनुसार, प्री आयपीओ शेअर्सचा ईपीएस (Earning per share EPS) २.६६ रूपये आयपीओनंतर ०.५३ रूपये असेल. सध्या कंपनीचे प्रवर्तक भांडवल (Stake) १००% आहे ते आयपीओनंतर ९०% होईल.कंपनीचा आरओसीई (Return on Capital Employed ROCE) ३०.१३% असून प्राईज टू बूक व्हॅल्यु १.६३ आहे. आयपीओतील मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनी वेगवेगळ्या फी कमिशनसाठी, इतर खर्चासाठी, अकाऊंटिंग खर्चासाठी, सेबीसह इतर नियामकांना प्रलंबित असलेल्या वेगवेगळ्या फी भरण्यासाठी, दैनंदिन कामकाजासाठी करण्यात येणार आहे.
१९७२ मध्ये स्थापन झालेली भारत कोकिंग कोल लिमिटेड (BCCL) कंपनी कोकिंग कोल, नॉन- कोकिंग कोल आणि वॉश्ड कोलच्या उत्पादनात गुंतलेली आहे. ही कंपनी कोल इंडिया लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत कंपनी चार भूमिगत, २६ खुल्या आणि चार मिश्र खाणींसह एकूण ३४ कार्यरत खाणींचे जाळे आहे. कंपनीचे मुख्य उत्पादन कोल म्हणजेच कोकिंग कोल (कोळसा) आहे.
कंपनीचे मुख्य उत्पादन कोकिंग कोल असून पोलाद आणि ऊर्जा उद्योगांना कंपनी कोळसा पुरवते. १ एप्रिल २०२४ पर्यंत भारत कोल (BCCL) कडे अंदाजे ७९१० दशलक्ष टन कोकिंग कोलचा साठा आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये बीसीसीएल (BCCL) चा भारतातील एकूण देशांतर्गत कोकिंग कोल उत्पादनात ५८.५०% वाटा होता. कंपनी झारखंडमधील झरिया आणि पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे कार्यरत आहे,
कंपनीच्या कार्यांमध्ये खुल्या आणि भूमिगत खाणकाम प्रकल्प, कोल वॉशरी, वॉशरी डेव्हलपर अँड ऑपरेटर (WDO) मॉडेलद्वारे बंद असलेल्या वॉशरींचे मुद्रीकरण, माइन डेव्हलपर अँड ऑपरेटर (MDO) मॉडेलद्वारे बंद पडलेल्या भूमिगत खाणी पुन्हा सुरू करणे व स्ववापर व ग्रिड इंजेक्शनद्वारे सौर ऊर्जा प्रकल्पांचे मुद्रीकरण यांचा समावेश आहे.कंपनीचे कोळसा उत्पादन आर्थिक वर्ष २०२२ मधील ३०.५१ दशलक्ष टनांवरून आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ४०.५० दशलक्ष टनांपर्यंत वाढले. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, कंपनीने ३९.११ दशलक्ष टन कोकिंग कोल आणि १.९९ दशलक्ष टन नॉन-कोकिंग कोलचे उत्पादन केले. आज दुपारी १.५८ वाजेपर्यंत शेअरची प्री आयपीओ जीएमपी (Grey Market Price GMP) १३ रूपये प्रिमियम होती.






