बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्य फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव आहेत. स्वतः बिग बी, त्यांची पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता नंदा, मुलगा अभिषेक बच्चन आणि बहुतेक तिसऱ्या पिढीतील ऐश्वर्या राय बच्चन यांनी या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे.त्यानंतर आता अगस्त्य नंदा, श्वेता नंदाचा मुलगा आणि अमिताभ बच्चनांचा नातू, यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. १ जानेवारी २०२६ रोजी रिलीज झालेल्या चित्रपट ‘इक्कीस’ मधून त्यांनी मोठ्या पडद्यावर डेब्यू केला. यामुळे बच्चन कुटुंबाची तिसरी पिढी मनोरंजन क्षेत्रात प्रवेश करते आहे.बच्चन परिवाराची फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळीच झलक आहे पण...
पडद्यावर पदार्पणानंतरच, अगस्त्यने बच्चन कुटुंबाचा वारसा पुढे नेण्याबाबत केलेले वक्तव्य अनेकांना आश्चर्यचकित करणारे ठरले आहे. त्यांच्या विधानावर बॉलिवूडमध्ये आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे, आणि चाहते उत्सुकतेने त्यांच्या आगामी चित्रपटाची प्रतीक्षा करत आहेत.
बच्चन आणि कपूर कुटुंब हे बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि प्रभावशाली कुटुंबांपैकी आहेत. त्यातून येत असल्यामुळे तिसऱ्या पिढीवर सतत दबाव असतो, असा प्रश्न दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी अगस्त्य नंदाला विचारला.
त्यावर अगस्त्यने स्पष्ट शब्दांत उत्तर दिले...
"मी जराही दबाव जाणवत नाही, कारण तो माझा वारसा नाही. माझं आडनाव नंदा आहे, कारण सर्वात पहिले मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे. त्यांना माझा अभिमान कसा वाटेल याचा मी विचार करतो आणि तो वारसा मी गांभीर्याने घेतो."
पुढे त्याने सांगितले...
"माझ्या कुटुंबातील इतर सदस्य, जे अभिनेते आणि अभिनेत्र्या आहेत, मला त्यांचं काम आवडतं आणि मी त्यांचं कौतुक करतो. पण मी त्यांच्यासारखा कधी बनू शकेन असं मला वाटत नाही. त्यामुळे त्याबाबत विचार करणं म्हणजे वेळेचा अपव्यय आहे."
अगस्त्यच्या या वक्तव्यामुळे स्पष्ट होते की, तो स्वतःच्या मार्गाने काम करायला इच्छुक आहे, आणि बच्चन कुटुंबाचा दबाव किंवा अपेक्षा त्याच्या निर्णयावर प्रभाव टाकत नाहीत..या वरुन सोशल मिडीयवर आणि अमिताभ बच्चन यांचे चाहत्यांमध्ये वेगळीच कुजबुज सुरु झाली आहे.या वरुन सर्व नेटकरी आपली टिपा टिपणी देताना दिसत आहेत...