महाराष्ट्रात गेल्या काही महीन्यांपासून वाहनांच्या अपघातीच्या घटना होत असल्याच पहायला मिळत आहेत. तसंच एका परिवाराचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाला आहे.. हा अपघात सोलापूर - पुणे महामार्गावर पंढरपूर पुलाजवळ आज पहाटेच्या ३ च्या सुमारास एका भरधाव केमिकल टँकरने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. दुचाकीवरील आई, वडील आणि त्यांच्या १५ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. हे कुटुंब मूळचे नंदुरबार जिल्ह्यातील असून ऊसतोडणी संपवून आपल्या गावाकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि होत्याच नंव्हत झाल..
नक्की घडलं काय ?
नंदुरबार जिल्ह्यात एक गंभीर अपघात झाला असून, तीन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाला आहे. माहितीप्रमाणे, हे कुटुंब पहाटे सुमारे ३ वाजता आपल्या दुचाकीवरून गावाकडे जात होते. अपघात पंढरपूर पुलाजवळ घडला, जेव्हा समोरून येणाऱ्या वेगवान केमिकल टॅंकरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली आणि तिघेही महामार्गावर उडाले. जखमी झालेल्या कामगारांना तात्काळ स्थानिक रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी घटनास्थळीच प्राण सोडले.