मागच्या वर्षी पुण्यातील दिनानाथ रुग्नालयामुळे तनीशा भिसे अशा गर्भवती महीलेचा वेळेवर उपचार न झाल्यामुळे मृत्यु झाला होता.उपचार सुरू करण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागण्यात आली होती. यामुळे उपचारात विलंब झाला आणि त्याचा परिणाम म्हणून तनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समजले आहे.तर या प्रकरणामुळे या रुग्नालयासंह ११ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे
प्रसिध्द गायक हृदयनाथ मंगेशकर आणि गायिका उषा मंगेशकर यांच्यासह ११ जणांवर फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे धर्मादाय आयुक्तालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या नावांच्या विरोधात आणि नामांकित रुग्णालयावर अशी फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. संयुक्त धर्मादाय आयुक्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राजेश परदेशी, दीपक खराडे, सचिन बकाळ आणि रवींद्र गावरे यांच्या समितीने हा तपास पूर्ण केला.
अहवालामध्ये काय आढळलं ?
१) गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणात संबंधित रुग्णालय दोषी ठरले आहे.
२) दोष सिद्ध झाल्यास संबंधित विश्वस्तांना एक वर्षापर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होण्याची तरतूद आहे.
३) कलम ६६ (B) अंतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे.