Monday, January 5, 2026

वन जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांचा पाणीप्रश्न सोडवणार

वन जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांचा पाणीप्रश्न सोडवणार

मंत्री आशीष शेलार यांच्याकडून दिलासा

मुंबई : प्रकाश दरेकर यांचा विजय तुमच्या झोपड्यांना, नळाला पाणी पोचविण्याच्या निर्णयाचे स्वागत करणारा असेल. या विभागात अद्ययावत रुग्णालय येण्याच्या कामाला गती देणारा असेल. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रकाश दरेकर प्रभाग क्रमांक ३ मधून मुंबई महापालिकेत पोहोचणार. निवडून आल्यावर ते पहिलाच ठराव वन जमिनीवर राहत असलेल्या नागरिकांच्या पाण्याप्रश्नी करतील, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी व्यक्त केला. भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार प्रकाश दरेकर यांच्या दहिसर (पूर्व) येथील निवडणूक कार्यालयाचा उद्घाटन सोहळा राज्याचे सांस्कृतिक मंत्री आमदार आशीष शेलार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी कॅबिनेट मंत्री आ.प्रवीण दरेकर, उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी, मागाठाणे विधानसभेचे शिवसेना आ. प्रकाश सुर्वे, माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, यांसह महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री आशीष शेलार म्हणाले की, मुंबई महापालिकेची निवडणूक ९ वर्षांनी होत आहे. २०१७ साली निवडणूक झाली होती. ९ वर्षांनी तुम्हाला संधी मिळाली आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन पोचवायचे असेल तर वनखात्याची परवानगी लागते. डोक्यावरचे छत राहील की नाही ही भीती मनात घेऊन येथील नागरिक राहत आहे. मी असा नेता नाही की माझे मातोश्री १ आणि मातोश्री २ बंगले आहे. घराच्या विवंचनेत असलेल्या नागरिकांना जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तोपर्यंत तुमच्या घराला कुणीही हात लावणार नाही, असा शब्द शेलारांनी दिला. ही महापालिका निवडणूक आपल्यासाठी महत्वाची आहे. प्रकाश दरेकर यांच्यासारखा नगरसेवक पदाचा उमेदवार महायुतीने विश्वासाने दिला आहे. केतकीपाड्याचा, शांती नगरचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही. येथील रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करण्याची भूमिका सरकार घेईल. विकासासाठी भाजपच्या कमळाच्या, महायुतीच्या मागे उभे राहा. प्रकाश दरेकर यांनी ज्या पद्धतीने प्रभाग क्र. ५ चा विकास केला तसाच प्रभाग क्र. ३ चा विकास करणार. विजयाचा चौकार मारण्याचे काम मतदारांनी करावे आणि प्रचंड मतांनी प्रकाश दरेकर यांना निवडून द्यावे, असे आवाहनही आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.

Comments
Add Comment