नवी दिल्ली : दिल्लीत २०२०च्या दंगलींशी संबंधित एका महत्त्वाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्णय दिला आहे. न्यायालयाने शरजील इमाम आणि उमर खालिद यांना जामीन देण्यास नकार दिला असून, त्याच प्रकरणातील इतर ५ आरोपींना मात्र जामीन मंजूर केला. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, उमर आणि शरजील या प्रकरणात एक वर्षापर्यंत जामीन अर्ज दाखल करू शकत नाहीत. हे प्रकरण कठोर दहशतवादविरोधी कायदा (यएपीए) अंतर्गत नोंदवण्यात आले होते. न्यायालयाने स्पष्ट केले की शरजील इमाम आणि उमर खालिद यांच्याविरोधात गुन्हेगारी कटात सहभागी असल्याचे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांना जामीन देता येणार नाही. ज्या पाच आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.