भोपाळ : एका कुटुंबात पालक आणि मुलांमधील संवाद आणि त्यांच्यातील घट्ट नाते लव्ह जिहादसारख्या घटना रोखू शकतात. जेव्हा घरात आणि कुटुंबात मुलांशी तुम्ही नियमित संवाद साधणार तेव्हा अशा घटनांवर अंकुश लागले. मुलांच्या भावना समजून घेता येतील. त्यामुळे या घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. एक प्रकारे लव्ह जिहादच्या समस्येवर मात करण्यासाठीचे हे एक सूत्र असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
भोपाळ येथील शिवनेरी भवन येथे आयोजित स्त्री शक्ती संवाद या कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते.
भागवत म्हणाले की, आपल्याला हे समजून घ्यायला हवे की अनोळखी व्यक्ती आपल्या मुलीला कसा भलवू शकतो? कुटुंबातील विसंवाद, सदस्यांमधील संवादातील कमी याचे या प्रकरणात मोठे योगदान आहे. जेव्हा कुटुंबात नियमित संवाद होईल.
तुम्ही मुलांशी संवाद साधला तर त्यांना धर्म, संस्कृती आणि पंरपरांची माहिती होईल, त्यांच्याविषयीचा स्वाभाविक सन्मान समोर येईल.यावेळी त्यांनी लव्ह जिहाद थोपवण्यासाठी त्रिसूत्री सुद्धा सांगितली. जेव्हा समाज सभ्यतेचे गोडवे गातो. तेव्हा त्यात महिलांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. आपला धर्म, आपली संस्कृती आणि सामाजिक व्यवस्था महिलांमुळे सुरक्षित असल्याचे भागवत म्हणाले. पश्चिम समाजातील स्त्रियांची स्थिती आणि भारतीय मातृत्व केंद्रीत समाज याची तुलना करत यामुळे भारतीय संस्कृती उंच स्थानी असल्याचे भागवत म्हणाले.





