Tuesday, January 6, 2026

Navi Mumbai Crime : मुलगीच्या प्रेमात पडला अन् झाल अपहरण,२० लाखोची खंडणीचा असा थरारक प्रकार..

Navi Mumbai Crime : मुलगीच्या प्रेमात पडला अन् झाल अपहरण,२० लाखोची खंडणीचा असा थरारक प्रकार..

Navi Mumbai Crime : सोशल मिडीयावरुन मैत्री करत प्रेमाच्या जाळ्यात फसवलं अन् मुलाचा अपहरण करत लाखो रुपयांच्या खंडणीची मागणी असा थरारक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे.इन्स्टाग्राम वरुन युवकाला फॅालो रिक्वेस्ट पाठवत व त्याच्याशी मैत्री करत मुलगी असल्याचे भासवून चार लोकांच्या टोळीने त्याच्याशी चॅटींग करत त्याला कल्याण पुर्व येथे भेटीस बोलवुन त्याच अपहरण केलं.व त्यानंतर त्याच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲप व्हॉइस मेसेजद्वारे तब्बल 20 लाख रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आली.पण मात्र, नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासांमध्ये चौघांना अटक करत मुलाची सुखरूप सुटका केली.

घाबरलेल्या पालकांनी तातडीने रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हे शाखा कक्ष-१ च्या पथकाने तांत्रिक तपास आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ज्या कारने मुलगा गेला होता, त्या कार चालकाला शोधून काढलं. चालकाने दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी नांदिवली येथील ठिकाणावर छापा टाकला आणि मुलाची सुटका केली.

या प्रकरणात पोलिसांनी प्रदीपकुमार जयस्वाल , विशाल पासी , चंदन मौर्या आणि सत्यम यादव या चौघांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Comments
Add Comment