Tuesday, January 6, 2026

शेअर बाजारात मोठे 'सेल ऑफ' या कारणामुळे गुंतवणूकदारांची पंचाईत सेन्सेक्स ३२२.३९ व निफ्टी ७८.२५ अंकांने कोसळला जाणून घ्या उद्याची स्ट्रेटेजी!

शेअर बाजारात मोठे 'सेल ऑफ' या कारणामुळे गुंतवणूकदारांची पंचाईत सेन्सेक्स ३२२.३९ व निफ्टी ७८.२५ अंकांने कोसळला जाणून घ्या उद्याची स्ट्रेटेजी!

मोहित सोमण: अखेर आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात अपेक्षित घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३२२.३९ अंकाने घसरला असून ८५४३९.६२ पातळीवर स्थिरावला असून निफ्टी ७८.२५ अंकाने घसरत २६२५०.३० पातळीवर स्थिरावला आहे. आज बँक निफ्टीतील घसरण अधिक प्रमाणात वाढल्याने आज बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात प्राईज करेक्शन झाले. प्रामुख्याने आज युएस व्हेनेझुएला यांच्यातील हाराकिरीचा दबाव कायम असताना भूराजकीय घडामोडीचा फटका आशियाई बाजारासह भारतीय बाजारात बसला असताना मोठ्या प्रमाणात तेल व गॅस यासह आयटी शेअर्समध्ये सेल ऑफ झाल्यानेही बाजारात गुंतवणूकदारांना फटका बसला. दरम्यान बँक व मिड कॅप निर्देशांकातही ब्लू चिप्स कंपनीच्या स्क्रिपमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाल्याने आज गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका बाळगल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्यापक निर्देशांकातील निफ्टी २०० (०.२७%), मिडकॅप ५० (०.२३%), मिडकॅप १०० (०.२५%), निफ्टी १०० (०.२८%) निर्देशांकात घसरण कायम राहिली असून स्मॉलकॅपमध्ये वाढलेला गुंतवणूकदारांचा कल बघता स्मॉलकॅप २५० (०.२५%), निफ्टी स्मॉलकॅप २५० (०.२५%), स्मॉलकॅप ५० (०.४२%) निर्देशांकात आज वाढ झाली आहे. निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात आज सर्वाधिक वाढ रिअल्टी (२.०५%), कंज्यूमर ड्युरेबल्स (१.०४%), मेटल (०.६१%), पीएसयु बँक (०.३९%) निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण आयटी (१.५०%), तेल व गॅस (१.०५%), फार्मा (०.३५%), हेल्थकेअर (०.४३%) निर्देशांकात झाली आहे.

आशियाई बाजारात अखेरच्या सत्रात आज गिफ्ट निफ्टी (०.५४%) वगळता सर्वच निर्देशांकात वाढ झाली आहे. सर्वाधिक वाढ निकेयी २२५ (३.२२%), स्ट्रेट टाईम्स (०.५२%), कोसपी (३.३२%), सेट कंपोझिट (१.५९%), शांघाई कंपोझिट (१.३६%) बाजारात झाली आहे. सकाळी संमिश्र प्रतिसाद देत असताना मोठ्या प्रमाणात आयटी, क्रूड तेलाच्या निर्देशांकात सुधारणा झाल्याने आशियाई बाजारात अधिक सुधारणा झाली आहे. दरम्यान युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात आज तीनपैकी दोन निर्देशांकात तेजी दिसत आहे. डाऊ जोन्स (०.१३%), एस अँड पी ५०० (०.१९%) बाजारात किरकोळ वाढ कायम राहिली असून नासडाक कंपोझिट निर्देशांकात किरकोळ घसरण झाली आहे.

आज कच्च्या तेलाच्या निर्देशांकातही मोठ्या प्रमाणात चढउतार सुरू झाली असताना मात्र युएसकडून व्हेनेझुएलातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात वाढ होण्याची शाश्वती निर्माण झाल्यावर तेलाच्या फ्युचर निर्देशांकात मोठी घसरण झाली होती. कमोडिटीतील दबाव वाढल्याने डॉलरच्या निर्देशांकात स्थैर्य आले होते. परिणामी डॉलरच्या तुलनेत रूपयातही आज घसरण झाली. आगामी काळात कच्च्या तेलाच्या बाबतीत मी कच्च्या तेलावरून नाराज आहे हे माझ्या मित्राला (पीएम मोदी) यांना माहिती आहे असा गर्भित इशारा दिल्याने घरगुती गुंतवणूकदारांकडून आगामी टॅरिफचा साशंकतेमुळे बाजारात नकारात्मक कौल दिला आहे. आधीच एच १ बी व्हिसा निर्णयामुळे होरपळून निघालेल्या आयटी तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज मोठे सेल ऑफ झाले. दरम्यान आज संरक्षण क्षेत्राच्या (Defence Stocks) शेअर्समध्ये मोठी वाढ झाल्याने घसरण एका मर्यादेत राहिली आहे. दुसरीकडे कमोडिटीतील दबाव वाढला असताना मोठ्या प्रमाणात सोन्याचांदीच्या किंमतीत वाढ झाली. अंतिमतः परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात सेल ऑफ केल्याची शक्यता आजही निर्माण झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांना नुकसान झाले.

अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ नेटवेब टेक्नॉलॉजी (८.२८%), ओला इलेक्ट्रिक (७.४३%), मेट्रोपॉलिस हेल्थ (६.०६%), सोभा (७.७९%), एसव्हीजेन (५.५५%), पीजी इलेक्ट्रोप्लास्ट (४.६३%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण एथर एनर्जी (७.६५%), सफायर फूडस (७.१०%), प्रिमियर एनर्जीज (६.८७%), कमिन्स इंडिया (३.८३%), आयडीबीआय (३.२८%), चालेट हॉटेल (३.०९%), वारी एनर्जीज (५.३०%) समभागात झाली आहे.

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' भारतीय १० वर्षांच्या बाँड उत्पन्नात सरकारी कर्ज घेण्याची अपेक्षा दिसून येत असल्याने २०२६ च्या पहिल्या पूर्ण आठवड्याची सुरुवात सावधगिरीने झाली. सकारात्मक बाब म्हणजे, नोव्हेंबरच्या घसरणीनंतर डिसेंबरच्या जीएसटी संकलनात सुधारणा दिसून आली, तर उत्पादन पीएमआय मध्यम झाला परंतु विस्ताराच्या क्षेत्रात स्थिर राहिला. बँक क्रेडिट/प्रगतीतील सुरुवातीच्या तिमाहीतील ट्रेंड मजबूत गती दर्शवितात, जे एकूण आशावादाला पाठिंबा देतात. जागतिक स्तरावर, गुंतवणूकदार अमेरिकेच्या प्रमुख आर्थिक डेटा आणि फेड मार्गदर्शनाची वाट पाहत आहेत, तर बीओजेने त्यांच्या कडक भूमिकेची पुष्टी केली आहे. पुढे पाहता, तिमाहीतील कमाई लक्ष केंद्रित करेल आणि जवळच्या काळातील बाजार ट्रेंडचे मार्गदर्शन करेल, भावना मध्यम सकारात्मक राहतील.'

आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'भारतीय शेअर बाजारांनी नवीन विक्रमी उच्चांक गाठला, परंतु गुंतवणूकदार सावध झाल्यामुळे उच्च स्तरांवरून विक्रीचा दबाव दिसून आला. बेंचमार्क निफ्टी निर्देशांकाने सत्रादरम्यान २६३७३ पातळीचा नवीन सर्वकालीन उच्चांक गाठला; तथापि, उच्चांकाजवळ नफावसुली झाल्यामुळे निर्देशांक खाली घसरला आणि सत्राच्या अखेरीस २६२०० पातळीच्या महत्त्वाच्या आधार पातळीची चाचणी घेतली. क्षेत्रीय आघाडीवर, रिअल्टी, कंझ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी, मेटल्स आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्सनी चांगली कामगिरी केली, तर आयटी, तेल आणि वायू, ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये कमजोरी दिसून आली. आठवड्याच्या शेवटी अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यानंतर वाढलेल्या भू-राजकीय तणावामुळे बाजारातील सहभागी मोठ्या प्रमाणावर तटस्थ राहिल्याने बाजारातील भावना सावध राहिली.

डेरिव्हेटिव्ह्ज सेगमेंटमध्ये, बाजाराची स्थिती मंदीवाल्यांच्या बाजूने झुकलेली होती, ज्यात ७४ शेअर्स वाढले तर १३९ शेअर्स घसरले. प्रीमियर एनर्जीज, वारी एनर्जीज, पीजीईएल, ३६० वन आणि ओएनजीसीमध्ये सर्वाधिक ओपन इंटरेस्टची वाढ नोंदवली गेली. निफ्टी ऑप्शन्समध्ये, २६३०० आणि २६४०० स्ट्राइक किमतींवर महत्त्वपूर्ण कॉल ओपन इंटरेस्ट दिसून आला, तर पुट बाजूला, सर्वाधिक ओपन इंटरेस्ट २६२०० आणि २६००० स्ट्राइकवर केंद्रित होता. निफ्टी पुट-कॉल रेशो (PCR) ०.८९ होता.'

आजच्या बाजारातील निफ्टी पोझिशनवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक वत्सल भुवा म्हणाले आहेत की,'सोमवारच्या सत्रात बँक निफ्टी निर्देशांकामध्ये उच्च स्तरांवरून नफावसुली दिसून आली, ज्यामुळे दैनंदिन चार्टवर एक मंदीची कँडलस्टिक तयार झाली. तथापि, निर्देशांकाने घसरत्या ट्रेंडलाइनचा ब्रेकआउट दिला असून तो त्याच्या अल्पमुदतीच्या १०- दिवसांच्या आणि २०- दिवसांच्या ईएमएच्यावर टिकून राहिला असल्याने, व्यापक चार्ट रचना सकारात्मक राहिली आहे. याव्यतिरिक्त, आरएसआय बुलिश क्रॉसओवरमध्ये आहे, जे गतीमधील अंतर्गत ताकद दर्शवते. त्यामुळे, जोपर्यंत बँक निफ्टी २०-दिवसांच्या ईएमएच्या (Exponential Moving Average EMA) पातळीवर टिकून राहतो, तोपर्यंत सकारात्मक दृष्टिकोनासह 'घसरणीवर खरेदी करा' (बाय-ऑन-डिप्स) ही रणनीती अवलंबली जाऊ शकते. तात्काळ आधार (Immediate Support) ५९७०० पातळीवर आहे, तर प्रतिकार (Resistance) ६०५०० पातळीवर आहे आणि पोझिशनल आधार (Positional Support) ५९३०० पातळीजवळ दिसत आहे'

आजच्या बाजारातील रूपयांच्या हालचालींवर भाष्य करताना एलकेपी सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष रिसर्च विश्लेषक जतीन त्रिवेदी म्हणाले आहेत की,'भूराजकीय तणावामुळे परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी झाल्याने आणि सोन्या-चांदीच्या किमती वाढल्याने, रुपया डॉलरच्या तुलनेत ९ पैशांनी घसरून ९०.२७ वर व्यवहार करत होता, ज्यामुळे चलनावर दबाव वाढला. अमेरिकेत एडीपी रोजगार, बिगर-शेती वेतनपट, बेरोजगारी आणि सुरुवातीच्या बेरोजगारीच्या दाव्यांसह महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीचा आठवडा असल्याने, डॉलरमध्ये आणि पर्यायाने रुपयामध्ये अस्थिरता येण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात चलन ८९.७५–९०.६५ रूपयांच्या विस्तृत मर्यादेत दबावाखाली राहण्याची शक्यता आहे.'

उद्याची गुंतवणूकदारांसाठी काय नवी स्ट्रॅटेजी?

एलकेपी सिक्युरिटीज वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे - नवीन सर्वकालीन उच्चांक नोंदवल्यानंतर निर्देशांकात नफावसुली दिसून आली. नजीकच्या काळातील कल मजबूत राहिला आहे, कारण निफ्टी अलीकडील ब्रेकआउट पातळीच्यावर बंद झाला. आरएसआय (Relative strength)आणि मूव्हिंग एव्हरेजसारखे मोमेंटम इंडिकेटर्स सकारात्मक स्थिती कायम ठेवत आहेत. खालच्या बाजूला (Down Side) २६१७०–२६२०० पातळीच्या पातळीवर आधार आहे. २६१७० पातळीच्या खाली निर्णायक घसरण झाल्यास २६००० पातळीच्या दिशेने करेक्शनची शक्यता आहे. वरच्या बाजूला (Up Side) २६३७०–२६४०० पातळीच्या पातळीवर प्रतिरोध (Resistance) आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >