Wednesday, January 7, 2026

ठाण्यात सापडला जिवंत हातबॉम्ब

ठाण्यात सापडला जिवंत हातबॉम्ब
ठाणे : ठाण्यात एका महिलेवर गोळीबार केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या दुचाकीची तपासणी केली. त्यात त्याच्या सीटखाली असलेल्या डिक्कीत जिवंत हॅण्डग्रेनेड सापडले. त्यामुळे आरोपीचा काही घातपात घडवण्याचा बेत होता का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. बॉम्बशोधक पथकाने हॅण्डग्रेनेड निकामी केले असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीकडे हॅण्डग्रेनेड आले कोठून? याचा तपास पोलीस करीत आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >