Tuesday, January 6, 2026

Kotak Mahindra Bank Quarterly Results: देशातील बड्या खाजगी बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या कर्जात १६% वाढ

Kotak Mahindra Bank Quarterly Results: देशातील बड्या खाजगी बँकेचा तिमाही निकाल जाहीर बँकेच्या कर्जात १६% वाढ

मोहित सोमण: देशातील बड्या खाजगी बँकेपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. बँकेच्या एकूण निव्वळ अँडव्हान्स/कर्ज (End of Period EOP) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १६% वाढ झाल्याचे बँकेने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले. त्यामुळे डिसेंबर २०२४ मधील ४६२६८८ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये ४८०२२९ कोटींवर वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे जी १६% वाढ होती. यासह बँकेच्या आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण सरासरी अँडव्हान्स/ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ३.०१% वाढ नोंदवली गेल्याचे बँकेने म्हटले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ४५८६१४ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ५२६०२५ कोटींवर वाढ नोंदवली आहे.

यासह बँकेच्या सरासरी कासा ठेवीत (Average CASA Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ४.०९% किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १९०८७१ कोटी रुपये तुलनेत या डिसेंबरमध्ये २०७९५५ कोटीवर वाढ नोंदवली आहे. यासह बँकेच्या एकूण मुदतोत्तर (Total Deposits End of Period) इयर ऑन इयर बेसिसवर ०.२% किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या २००४१२ कोटी रुपये तुलनेत या डिसेंबरमध्ये २०७९५५ कोटीवर वाढ नोंदवली आहे.

आज बँकेच्या शेअर्समध्ये ०.१३% घसरण झाल्याने शेअर २१९२.३० रूपयांवर व्यवहार करत होता. गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये २.०८% वाढ झाली असून गेल्या महिनाभरात बँकेच्या शेअर्समध्ये १.७४% घसरण झाली आहे. संपूर्ण वर्षभरात बँकेच्या २३.१९% वाढ झाली असून इयर टू डेट (YTD) मात्र ०.२४% घसरण नोंदवली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >