२०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत.
आयोजकांची माणगाव मध्ये पत्रकार परिषदेतून माहिती.
माणगाव : रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून आयोजित भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र, पुणे तर्फे २०० दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय मोफत बसविण्यासाठी मोजमाप शिबिर माणगाव येथे रविवार दि. ०१ फेब्रुवारी रोजी वनवासी आश्रम शाळा, उतेखोल येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रव्यापी संघटना आहे. प्रेरणास्थान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे.दिव्यांगाना कृत्रिम अवयव बसविणे हा प्रमुख राष्ट्रव्यापी सेवा प्रकल्प आहे. आणि भारत विकास परिषद आणि संलग्न संघटना कार्यरत आहेत.भारतातील १३ दिव्यांग केंद्रांपैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी पुणे येथील दिव्यांग केंद्र गेल्या २५ वर्षापासून अखंड कार्यरत आहे. भारत विकास परिषदेच्या महाराष्ट्र स्तरावर मोफत दिव्यांग शिबीर घेणाऱ्या दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे तर्फे दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय, हात व कॅलिपर बसविण्यात येतात. तसेच सदर दिव्यांग केंद्रातर्फे एपिल २०२५ मध्ये एकाच शिबिरात ८९२ दिव्यांगांना कृत्रिम पाय बसवून जागतिक विक्रम केला आहे त्याची नोद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली. यांच्या निधीतून हे मोफत दिव्यांग शिबिर आयोजित केले आहे. रोटरी क्लब ही अनेक सामाजिक कार्य करणारी आंतरराष्ट्रीय संस्था असून रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून हे मोफत दिव्यांग शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माणगाव तालुका कार्यवाह अजित शेडगे, यांनी उपस्थितांचे स्वागत केले. विश्वस्त व दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी शिबिराच्या संपूर्ण नियोजनाची आणि आधुनिक मॉडयूलर पायाविषयी माहिती दिली. माहिती देताना ते म्हणाले आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची कमर्शियल किमंत रु. ५० हजारापेक्षा जास्त असून असे कृत्रिम पाय ह्या शिबिरात २०० दिव्यांगांना मोफत देणार आहोत. परंपरागत जयपूर फूट पेक्षा हे आधुनिक मॉड्यूलर कृत्रिम पाय ऑटोफोल्ड असून वजनाने हलके आहेत. आधुनिक कृत्रिम मॉड्यूलर पाय बसविल्यानंतर दिव्यांन व्यक्ती चालणे, पळणे, पोहणे, उडी मारणे, वाहन चालविणे व शेती कामे इ. प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात तसेच मधुमेही रुग्णांना देखील या पायाचे खूप फायदे आहेत.त्याबाबत तज्ञांमार्फत त्यांना मार्गदर्शनही केले जाते.
हे शिबीर रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या निधीतून आयोजित भारत विकास परिषद कोथरूड व दिव्यांग केंद्र पुणे तर्फे १ फेब्रुवारी २०२६ सकाळी ९ ते १२ या वेळेत वनवासी कल्याण आश्रम दत्तनगर येथे आयोजित करण्यात आले आहे.माणगाव परिसरातील आणि रायगड जिल्हा व जवळपासच्या जिल्ह्यातील सर्व दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी शिबिरासाठी फोन द्वारे पूर्व नोंदणी करावी. यासाठी विनोद ९८८११३८०५२ चंद्रशेखर ९८२३०२४२३२ यांना नोंदणी साठी संपर्क करावयाचा आहे. दिव्यांग व सोबती यांचेसाठी मोफत भोजन चहा इ. सोय करण्यात आली आहे. तसेच दिव्यांगासाठी वाहन व्यवस्था (पिक अप) माणगाव रेल्वे स्टेशन व माणगाव एस टी स्टँड येथून करण्यात आली आहे.रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रोचे प्रोजेक्ट कन्व्हेनर आर्या पळसुले यांनी शेवटी या पत्रकार परिषदेत उपस्थितांचे आभार व्यक्त केले.






