Wednesday, January 7, 2026

आंध्र प्रदेशमध्ये गॅस पाइपलाइनमध्ये गळतीमुळे आग

आंध्र प्रदेशमध्ये गॅस पाइपलाइनमध्ये गळतीमुळे आग
कोनसीमा : आंध्र प्रदेशातील कोनसीमा जिल्ह्यात ओएनजीसीच्या पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाल्यानंतर भीषण आग लागली. ही घटना मलिकिपुरम गावातील इरुसमांडा परिसरात घडली असून, आग आणि दाट धुरामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अनेक गावांतील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओएनजीसीच्या पाइपलाइनमधून अचानक मोठ्या प्रमाणात गॅस बाहेर पडू लागला. काही क्षणांतच या गॅसला आग लागली आणि आगीने वेगाने रौद्र रूप धारण केले. दाट धुरामुळे आसपासची गावे धुराच्या विळख्यात सापडली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा