डॉक्टर, यांचा समावेश
भाईंदर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युवकांना संधी देण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी भाजपने दिलेल्या ८६ उमेदवारात १३ उच्चशिक्षित युवकांना संधी दिली आहे.
मीरा भाईंदर भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष रणवीर वाजपेयी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकीसाठी युवा मोर्चाने जिल्हाध्यक्षांकडे २३ जागांची मागणी करून एक यादी दिली होती. त्यानुसार जिल्हाध्यक्षांनी १३ युवकांना उमेदवारी दिली आहे यात ८ युवती ५ युवक यांचा समावेश आहे. त्यात ७ मराठी तर ६ इतरांना संधी दिली आहे.
यामध्ये तरूण शर्मा-एलएलबी, प्रियंका चरण-एम.कॉम. बी.एड., डॉ. भाव्या शहा-एमबीबीएस, किमया रकवी-मास्टर इन इंजिनिअर मॅनेजमेंट, महेश म्हात्रे-बिजनेस कन्सल्टंट, आकांक्षा विरकर- बॅचलर इन फॅशन डिझाइन आदी. उमेदवार आहेत.
यात सर्व उमेदवार उच्चशिक्षित आहेत. डॉक्टर, वकील, इंजिनियर,एमबीए यांचा समावेश आहे तर एक युवती परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेली आहे. यातील अनेक युवक युवती त्यांच्या प्रभागात गेल्या काही वर्षापासून कार्यरत असून त्यांचे समाजकार्य कौतुकास्पद आहे.
त्यामुळे असे युवक निवडून आल्यानंतर पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल. उच्च शिक्षित असल्याने आपले मत व प्रश्न ते सभागृहात व्यवस्थितपणे मांडू शकतील त्यातून शहराचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचे रणवीर वाजपेयी यांनी सांगितले. युवती शहर अध्यक्षा श्रद्धा बने आणि अन्य उपस्थित होते.
प्रभाग.क्र. उमेदवाराचे नाव शिक्षण
३ तरुण शर्मा एलएलबी
५ प्रियंका चरण एम.कॉम. बी.एड.
७ डॉ. भाव्या शहा एमबीबीएस
८ किमया रकवी मास्टर इन इंजिनिअर मॅनेजमेंट
१० महेश म्हात्रे बिजनेस कन्सल्टंट
१० आकांक्षा विरकर बी.कॉम, बॅचलर इन फॅशन डिझाइन
११ विशाल पाटील व्यावसायिक
१५ मनस्वी पाटील आय.टी. इंजीनियर
१८ मयुरी म्हात्रे एल.एल.बी.
१९ विवेक उपाध्याय एम.बी.ए.






