Tuesday, January 6, 2026

Bandhan Bank Share after Quarter Results: दमदार तिमाही निकालानंतर बंधन बँकेच्या शेअर्समध्ये थेट ४% उसळी

Bandhan Bank Share after Quarter Results: दमदार तिमाही निकालानंतर बंधन बँकेच्या शेअर्समध्ये थेट ४% उसळी

मोहित सोमण: बंधक बँकेने समाधानकारक कामगिरी नोंदवल्यानंतर बँकेच्या शेअर्समध्ये ४% वाढ सुरुवातीच्या सत्रात झाली आहे. बँकेने आपल्या एकूण ठेवीत ११% वाढ नोंदवल्यानंतर बँकेच्या शेअरने आच चांगली कामगिरी नोंदवली आहे. दुपारी १२.२० वाजेपर्यंत बँकेच्या शेअर्समध्ये २.०१% वाढ झाल्याने शेअर १४७.३६ रुपये प्रति शेअरवर व्यवहार करत आहे. सकाळी सुरुवातीच्या कलात शेअर १५०.०५ रूपये प्रति शेअर इतक्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला होता. बँकेच्या एकूण तिमाहीतील आकडेवारीनुसार, बँकेच्या एकूण कर्ज व अँडव्हान्सेसमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) १०% वाढ नोंदवल्याचे बँकेने स्पष्ट केले. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १३२०१९ कोटींच्या तुलनेत या डिसेंबरमध्ये १४५२२७ कोटींवर वाढ झाल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. सप्टेंबर महिन्यात ते १५८०७५ कोटी रुपये होते. तिमाही बेसिसवर (Quarter on Quater QoQ) मात्र ते घसरण डिसेंबर २०२५ पर्यंत १५५७२३ कोटींवर म्हणजेच ०.९०% घसरले आहे.

बँकेच्या आकडेवारीनुसार, बँकेच्या कासा ठेवीत (Current Account Saving Account CASA) ठेवीत इयर ऑन इयर बेसिसवर मात्र -३.३% घसरण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ४४७३५ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ४२७३० कोटीवर घसरण झाली. बँकेच्या रिटेल ठेवीत (Retail Term Deposits) इयर ऑन इयर बेसिसवर ४.१% वाढ झाल्याचे बँकेने नोंदवले होते. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ५२०६३ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये ७०६९० कोटींवर वाढ झाली आहे. एलसीआर गुणोत्तर (Liquidity Coverage Ratio LCR) १४९.१४% असल्याचे बँकेने निकालाद्वारे स्पष्ट केले होते. तर कासा गुणोत्तर डिसेंबर महिन्यात २७.२६% व सप्टेंबर महिन्यात २७.९७% होते.

या निकालामुळे बँकेच्या ठेवीत व तरलतेत (Liquidity) चांगली सुधारणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तत्पूर्वी मागच्या महिन्यात बँकेने आपल्या (अनुत्पादक मालमत्ता Non Performing Assets) ६९.३१ अब्ज रूपयांचे एनपीए बिडींग प्रक्रियेद्वारे घोषित केले होते. सप्टेंबर २०२४ पर्यंत बँकेच्या तरलतेवर परिणाम झाल्याने व असेट क्वालिटीत नकारात्मक परिणाम झाल्याने एनपीए विकण्याचा मोठा निर्णय बँकेने गेल्या महिन्यात घेतला. यंदा बँकेच्या कामगिरीत सुधारणा झाल्याने मोठ्या प्रमाणात फंडामेंटल सुधारल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. गेल्या ५ दिवसात बँकेच्या शेअर्समध्ये १.२३% वाढ झाली असून गेल्या १ महिन्यात शेअर्समध्ये ५.१८% वाढ झाली तर संपूर्ण वर्षभरात मात्र शेअर्समध्ये २.८२% घसरण झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) ०.९५% वाढ झाली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >