वॉशिंग्टन : अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांच्या घरावर हल्ला झाला. ओहायोमध्ये असलेल्या जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या. या प्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून हा हल्ला कोणी आणि का केला, याचा तपास सध्या सुरू आहे. व्हान्स यांच्या निवासस्थानी घडलेल्या या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक करण्यात आली.घटनेच्यावेळी उपराष्ट्रपतींचे कुटुंब घरात उपस्थित नव्हते आणि हल्लेखोराने घरात प्रवेश केला नसावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रांमध्ये उपराष्ट्रपतींच्या घराच्या खिडक्या फुटलेल्या स्पष्टपणे दिसत आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले आहे की, हल्लेखोराने जेडी वेंस किंवा त्यांच्या कुटुंबीयांनाच लक्ष्य केले होते का, याची चौकशी सुरू आहे. हा हल्ला कोणाच्या व कोणत्या उद्देशाने केला, याबाबतची माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे.






