काही लोक Ai चा वापर करून माझ्या नावाने...'फेक न्यूज' पसरवणाऱ्यांवर अथर्व सुदामेचा संताप!"


मुंबई : अथर्व सुदामे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये परवानगीशिवाय रील शूट करणं आणि महिला प्रवाशांबद्दल आक्षेपार्ह आशय दाखवल्या ठपका त्याच्यावर ठेण्यात आलाय. याप्रकरणी PMPML प्रशासनाने त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. पुणेरी विनोदी व्हिडिओंनी नेटकऱ्यांना हसवणाऱ्या अथर्वला अनेकदा अशा वादाला तोंड द्यावं लागलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून या वादाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. यावर त्यानं मौन सोडलं आहे. त्यानं वादावर थेट न बोलताना सोशल मीडियावरील चुकीच्या चर्चेवर भाष्य केलंय.


काय म्हटलंय अथर्व सुदामेनं?


अथर्व मिडियाशी बोलताना नमस्कार बरेचसे न्यूज चॅनेल्स आणि मीडियामधील माध्यमं माझं रील न बघता वाट्टेल ते लिहीत आहेत आणि पसरवत आहेत . मी ना कोणाला प्रतिक्रिया दिलीय ना कोणाशी चर्चा केली आहे, तरीही कोणीही काही वाक्य माझा फोटो आणि नाव वापरून पसरवत आहेत. तर काही लोकं Ai चा वापर करून वाट्टेल ते विधान माझ्या नावाने खपवत आहेत त्यामुळं कृपया अश्या कुठल्याही फेक न्यूजवर विश्वास ठेऊ नका. मला जर काही बोलायचं असेल तर ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलीन, असं म्हणाला.


नेमका वाद काय?


अथर्वने काही दिवसांपूर्वीच एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यामध्ये तो PMPML बसमध्ये कंडक्टरच्या भूमिकेत दिसत आहे. या रीलमध्ये त्याने महामंडळाचा अधिकृत गणवेश, ई-तिकिटिंग मशीन आणि बॅज यांचा वापर केला होता. PMPML च्या मते, हे चित्रीकरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. प्रशासनानं या व्हिडिओवर त्याच्यावर आरोप केले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचा व्यावसायिक रीलसाठी वापर करताना आवश्यक असलेली लेखी परवानगी घेतली गेली नाही, असं त्यांनी आरोप करताना म्हटलंय. तसंट या व्हिडिओमधील संवाद आणि सादरीकरणामुळं महिला प्रवाशांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि मानसिक सुरक्षिततेला धक्का लागल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आलंय.संबंधित रील सोशल मीडियावरून तात्काळ हटवण्यात यावी, असंही अथर्वला सांगण्यात आलं आहे. दीपिका पडूकोणचे हे हटके चित्रपट तुम्हाला माहीत आहेत का ?


Comments
Add Comment

अभिनेत्री ममता कुलकर्णीची किन्नर आखाड्यातून हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य

अ‍ॅटलीने दीपिका पादुकोणला म्हटले ‘लकी चार्म’; AA22XA6 मध्ये दिसणार अगदी नवा अवतार

मुंबई : दिग्दर्शक अ‍ॅटली यांचा आगामी चित्रपट, ज्याला सध्या AA22XA6 असे तात्पुरते नाव देण्यात आले आहे, अधिकृत

शाहरुख खानच्या 'किंग' चित्रपटाचा प्रोमो समोर; रिलीज तारीख जाहीर...

मुंबई : चित्रपट सृष्टीतील सर्वांचा आवडता अभिनेता शाहरुख खान. शाहरुख खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'किंग'ची

मराठी रीलस्टार प्रथमेश कदमचे निधन

मुंबई : लोकप्रिय मराठी रीलस्टार आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचं निधन झालं आहे. प्रथमेशच्या निधनाचे

Konkan Hearted Girl : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने शेअर केली गुड न्यूज; घरी आली नवी ‘लक्ष्मी’...

बिग बॉस मराठी ६ मधील लोकप्रिय स्पर्धक आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द असणारी ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी

Border 2 Collection Day 1: सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’चा बॉक्स ऑफिसवर पहील्याच दिवशी धुमाकुळ

बॉर्डर २: सनी देवलच्या बॅार्डर २ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर आपली वेगळीच धमाल केली आहे.देशभक्ती, ॲक्शन आणि भावनिक