Tuesday, January 6, 2026

मराठी मालिकांमधील अभिनेत्यांने व्यक्त केली निराशा...निर्मात्याने पेंमेंट न दिल्याने अभानेता संतापला !

मराठी मालिकांमधील अभिनेत्यांने व्यक्त केली निराशा...निर्मात्याने पेंमेंट न दिल्याने अभानेता संतापला !
प्रसिध्द मालिका "होणार सुन मी या घरची" व 'मुरांबा' या सारख्या अनेक मालिकेन मध्ये काम करणारा अभिनेता शशांक केतकर याने आपली निर्मात्यावर भडास काढली आहे.अलीकडेच शशांक केतकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्याच्यासोबत झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे.एका मालिकेच्या निर्मात्याकडून आपलं मानधन अद्याप थकवलं गेल्याचा गंभीर आरोप त्याने या व्हिडीओत केला आहे. काम पूर्ण करूनही मेहनतीचं योग्य मानधन मिळत नसेल, तर कलाकारांनी गप्प बसायचं का? असा थेट सवालही शशांकने उपस्थित केला आहे. ५ वर्ष होऊन गेलीत पण पेमेंट हातात नाही मागची ५ वर्ष आणि ८ ऑक्टोबर २०२५ पासून पुन्हा संपर्क निर्माण झाल्यानंतर दिलेली एकही तारीख त्या निर्मात्याने पाळलेली नाही थोडक्यात काय निगरगट्ट, कोडग्या निर्मात्याच्या थापांचा आता कंटाळा आला आहे... अजून एक म्हणजेच 5 जानेवारी 2026 ही तारीख त्याने दिली आहे. पूर्ण पेमेंट जमा झाले नाही तर सगळ्या कुंडलीसकट एक डिटेल व्हिडिओ करेन आणि पेमेंट झाले तर तसाही ते झाल्याचा एक व्हिडिओ पण पोस्ट करेन..." या वरुन चाहत्यानमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली आहेत.चाहत्यांच्या कॅामेंट मधुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अभिनत्याने कोणत्याही निर्मात्याच नाव न घेता निर्मात्याला ईशारा दिला आहे.यावरुन नेटकरी वेगवेगळे अदांज लावत आहेत. या सर्व प्रकरणावरुन त्याच्या चाहत्यांसह मराठी टेलिव्हिजन विश्वातही चर्चा पाहायला मिळतेय.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा