Monday, January 5, 2026

काय सांगता ? दोन हजाराच्या पाच हजार कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या नोटा अद्याप चलनात

काय सांगता ? दोन हजाराच्या पाच हजार कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या नोटा अद्याप चलनात

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने साल २०२३ मध्ये चलनातून बाद केलेल्या २००० रुपयांच्या गुलाबी नोटा अजूनही संपूर्णपणे बँकेत परत आलेल्या नाहीत. साल २०२५ च्या अखेरपर्यंतचे आकडे आलेले आहेत. आरबीआयने सांगितले की अजूनही ५००० कोटी रुपयांहून जास्त किमतीच्या गुलाबी नोटा बँकेत परत येण्याची बाकी आहे. म्हणजे इतक्या किमतीच्या नोटा अजूनही लोकांकडे आहेत. खास बाब म्हणजे या नोटा रिटर्न करण्याची सुविधा असूनही लोकांद्वारे उशीर केला जात आहे. आरबीआयने २००० रुपयांच्या नोटासंदर्भात महत्त्वाची अपडेट जारी केली आहे. आरबीआय म्हणाले की २००० रुपयांच्या नोटा १९ मे २०२३ रोजी सर्क्युलेशनच्या बाहेर केल्या होत्या. या नोटा बँकेत परत करायच्या होत्या. परंतु आतापर्यंत सर्व नोटा बँकेत परत केलेल्या नाहीत. त्यावेळी बाजारात ३.५६ लाख कोटी रुपयांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा होत्या. संपलेल्या ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एकूण ९८.४१ नोटांची बँकेत वापसी झाली आहे. अजूनही ५,६६९ कोटी रुपये मूल्यांच्या २ हजारांंच्या नोटा बँकेत परत आलेल्या नाहीत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >