मुंबई : रस्ते, कचरा, कोविड सेंटर, टॅब खरेदी, नाफेसफाई आदी मुंबई महानगरपालिकेच्या कामांमध्ये गेल्या 25 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या उबाठा पक्षाने तब्बल साडेतीन लाख कोंटी रुपयांच्या पैशावर डल्ला मारला आहे. ‘उबाठा’ने केलेला घोटाळा देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांनी केला आहे. तसेच मुंबईकर यावेळी ‘उबाठा’ नेत्यांना घरी बसवेल, असा विश्वास आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केला.
‘उबाठा’ने मुंबई महापालिका निवडणुकीचा जाहीरनामा रविवारी प्रकाशित केला. त्यातील विसंगतीवर बोट ठेवताना आमदार अमीत साटम यांनी 'उबाठा’ विरुद्ध 'आरोपपत्र' प्रकाशित केले.
https://www.youtube.com/live/sA9FzjaHdTAरस्ते निविदा प्रक्रियेतील अनियमितता
यावेळी बोलताना आमदार अमीत साटम म्हणाले की, एकवीस हजार कोटी रुपये खर्चून सुद्धा मुंबईकरांच्या नशिबी खड्डेमुक्त रस्ते आले नाहीत. निविदा प्रक्रियेतील अनियमित्ता, अधिकच्या दराने निविदा देणे, काळ्या यादीतील कंपन्यांना निवेदन देणे.. या मार्गाने गेली 25 वर्षे ‘उबाठा’ने मुंबईकरांचे पैसे लुटले आहेत.
कोविड-१९ घोटाळा आणि ईडीची कारवाई
लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेसला बनावट कागदपत्रांच्या आधारे कोविड काळात कंत्राट दिले गेले. ‘उबाठा’चे प्रवक्ते संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांचा यामध्ये सहभाग होता. पाटकर यांच्यावर ‘ईडी’ने मनी लॉन्ड्रींचा गुन्हा दाखल केला. कोविड काळातील ‘उबाठा’चा घोटाळा शंभर कोटीचा आहे. पंधराशे रुपयांना मिळणारी बॉडी बॅग मुंबई महापालिकेने 6721 रुपयांना खरेदी केली. ऑक्सिजन प्लांटमध्ये 320 कोटींचा घोटाळा केला. इतका खर्च होवूनही महाराष्ट्रात कोविडचा मृत्युदर अधिक राहिल्याचे आमदार अमीत साटम म्हणाले.
'उबाठा’चा मराठी भाषेबद्दल खोटा कळवळा आणि शिक्षणात घोटाळा
उबाठा’चा मराठी भाषेबद्दल खोटा कळवळा उघड करताना आमदार अमीत साटम म्हणाले, मागील दहा वर्षात मुंबईतील 114 मराठी माध्यमांच्या शाळा बंद पडल्या असून आज मराठी माध्यमांच्या केवळ 254 शाळा शिल्लक आहेत. टॅब खरेदीत 40 कोटी खाल्ले. शिक्षण क्षेत्रातला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा घोटाळा 182 कोटींचा असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
धरण प्रकल्प रद्द आणि पाणी दरात वाढ
गारगाई, पिंजाळ पाणी प्रकल्प यांनी रद्द केले. जलकरात दरववर्षी 8 टक्के वाढ केली. अशा प्रकारे ‘उबाठा’ने पाणी प्रकल्पात मुंबईकरांना 680 कोटींना चुना लावल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
नालेसफाईत घोटाळे, पूर आणि मिठी नदीचे अपयश
नालेसफाई मध्ये गाळ न काढताच गाळाचे वजन वाढवून कंत्राटदारांना पैसे दिले. ‘कॅग’ने अहवालामध्ये बाराशे कोटींच्या अनियमिततेवर कोरडे ओढले आहेत. दहा हजार कोटी खर्च करूनही ‘उबाठा’ला मुंबईतील पूर नियंत्रण करण्यात अपयश आले. दोन हजार कोटी खर्च करून मीठी नदीचा प्रकल्प 20 वर्षानंतर अपूर्णच राहिल्याचा आरोपही आमदार अमीत साटम यांनी केला.
कचरा वाहतूक आणि बेस्ट बस घोटाळे; मेट्रो थांब्याच्या कामांमुळे आणि भोगवटा प्रमाणपत्र शुल्कामुळे नुकसान
कचरा वाहून येणाऱ्या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये घोळ घालून 900 कोटींचा घोटाळा केला. बेस्टसाठी इलेक्ट्रिक बस खरेदी करताना 3600 कोटींचे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिले. पत्राचाळ प्रकल्पात 1034 कोटीचा तर दत्तक वस्ती योजनेमध्ये सहा हजार कोटी रुपये ‘उबाठा’ कार्यकर्त्यांनी लाटले. पेंग्विन देखभालीमध्ये 15 कोटींचा तर भोगवटा प्रमाणपत्र शुल्क माफीत पालिकेला पाच हजार कोटींचा फटका बसला. मेट्रो प्रकल्पाच्या कामांना स्थगिती देऊन राज्याचे 10,000 कोटीचे ‘उबाठा’ने नुकसान केल्याचे आमदार अमीत साटम म्हणाले.
मुंबईकर 'उबाठा'ला घरी बसवणार :
गेल्या पंचवीस वर्षांपासून महापालिकेवर ‘उबाठा’ची सत्ता होती. प्रामाणिक मुंबईकरांच्या कष्टाने कमावलेल्या पैशांनी ‘उबाठा’च्या मंडळींनी स्वतःची तिजोरी भरली. यावेळी मुंबईकर त्यांना घरी बसवणार आहे, असा विश्वासही आमदार अमीत साटम यांनी व्यक्त केला.
'उबाठा’ मुंबईच्या रंग बदलण्याच्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे भागीदार
मतांसाठी ‘उबाठा’ने मुंबईची सुरक्षितता धोक्यात आणली आहे. ‘मामूं’ची टोळी या शहराचा रंग बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. पाकिस्तानचे झेंडे यांच्या प्रचारफेरीत फडकले होते, बॉम्बस्फोटाच्या आरोपींनी यांचा प्रचार केला होता, पाकिस्तान झिंदाबाद घोषणा देणाऱ्या रशीद मामूला यांनी पक्षात प्रवेश दिला, विनयभंग आणि फसवणुकीचे आरोप असणाऱ्या चंगेज मुलतानीला यांनी प्रवेश दिला, देशद्रोही असणाऱ्या उमर खालिदच्या कार्यक्रमाला यांनी मुख्यमंत्री असताना परवानगी दिली होती, त्यामुळे 'उबाठा’ मुंबईच्या रंग बदलण्याच्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे भागीदार आहे, असा आरोपही आमदार अमीत साटम यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी प्रत्येक मध्यमवर्गीय मराठी माणूस, कोकणी माणूस आणि मालवणी माणसाला शिवी घातली
आजच्या पत्रकार परिषदेत आमदार अमीत साटम यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांनी वापरलेल्या शिवीबाबत आमदार अमीत साटम म्हणाले, मी एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून येतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केवळ मलाच नाही, तर प्रत्येक मध्यमवर्गीय मराठी माणूस, कोकणी माणूस आणि मालवणी माणसाला शिवी घातली आहे.






