Monday, January 5, 2026

चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी!

चिपी विमानतळावर नाईट लँडिंगला परवानगी!

वीज पुरवठ्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्याकडून अडीच कोटींचा निधी

कणकवली : सिंधुदुर्गातील चीपी विमानतळाने आज विमान वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. डीसीजीएकडून आयएफआर लायसन्स आणि ऑपरेशन्सना मंजुरी मिळाल्यामुळे, या विमानतळावर २४×७, रात्रंदिवस, सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विमानतळावरील पार्किंगची क्षमता ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढवण्यात आली असून, यामुळे विमानतळाची कार्यक्षमता दुप्पट झाली आहे. डिसेंबर महिन्यात ११ हजार प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला असल्याने सिंधुदुर्ग विमानतळ देशातील ७५ प्रमुख विमानतळांच्या यादीत मानाने स्थान मिळवेल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

नाईट लँडिंगच्या परवानगीसाठी खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. चिपी विमानतळ येथे नाईट लँडिंगसाठी आवश्यक असणारा वीज पुरवठा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंनी जिल्हा नियोजनमधून अडीच कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्यामुळे चिपी विमानतळाला आवश्यक असलेला वीज पुरवठा सुरळीत झाला आणि पुढील परवानगी मिळण्यास सोईचे ठरले.

खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे निर्णय : आमदार निलेश राणे

चिपी विमानतळाला ‘नाईट लँडिंग’ची ऐतिहासिक मंजुरी मिळाली आहे. चिपी विमानतळाला आयएफआर लायसन्स प्राप्त झाल्यामुळे सर्व ऋतूंमध्ये नाईट लँडिंग शक्य झाले आहे. विमान पार्किंग क्षमता ३ वरून ६ विमानांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. खा. नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय नागरी विमान वाहतूक विभाग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याबद्दल खा. नारायण राणे व नागरी विमान वाहतूक महासंचालनालय विभागाचे आमदार निलेश राणे यांनी आभार मानले आहेत. चिपी विमानतळ येथे नाईट लँडिंगसाठी पाठपुरावा करून नाईट लँडिंगसाठी जिल्हा नियोजन निधीतून २ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आमदार निलेश राणे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >