Monday, January 5, 2026

मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकवल्यानंतर १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकवल्यानंतर १५ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

डहाणू : तलासरीच्या वेवजी येथील लोकभारती संस्थेच्या भारती अकादमी इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव सुरू होता. यामध्ये विविध स्पर्धांचा समावेश होता .मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान दुःखद घटना घडली . मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. विद्यार्थिनीने मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावलेला . शर्यत पूर्ण केल्यानंतर आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने या मुलीचा जीव गेल्याचे समजते. विजयाचा आनंद साजरा करण्यापूर्वीच काळाने मुलीवर झडप घातली. शर्यत संपल्यानंतर तिला धाप लागत होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने ती मैदानात बसली आणि काही क्षणातच बेशुध्द पडली. शिक्षकांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालायत दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणाची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. ताज्या घटनेमुळे विद्यार्थाच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कडक उन्हात होणारे क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि त्यामुळे होणार त्रास , पिण्याच्या पाण्याची गैरसोय आणि उपाशीपोटी स्पर्धत सहभागी होणे . यामुळे विद्यार्थी आजारी पडतात , त्यांना चक्कर येते किंवा बेशुध्द देखील पडतात. या घटनेमुळे केवळ औपचारिकतेसाठी स्पर्धेांच आयोजन न करता शाळांनी विद्यार्थांच्या आरोग्याची आणि सुरक्षतेची जबाबदारी घेतली पाहिजे; अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Comments
Add Comment